Latest Marathi News | संशयितांना अटक करा; अन्यथा उपोषण करणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Dhule News : संशयितांना अटक करा; अन्यथा उपोषण करणार

धुळे : येथील शिव प्रभू शिक्षण संस्थेच्या वार (ता. धुळे) येथील प्रतिभा माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ विद्यालयात खोटी व बनावट कागदपत्रांआधारे पद भरती झाली. याबाबत जिल्हा न्यायालयात तक्रार दाखल झाल्यानंतर आदेशान्वये पश्‍चिम देवपूर पोलिस ठाण्यात दोघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

तरीही संशयितांना अटक होत नसल्याने फिर्यादीने सोमवारपासून (ता. ९) जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ उपोषणाचा निर्णय घेतला आहे. (Position in school organization with the help of fake documents police arrest suspect intimation of hunger strike Dhule News)

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

हेही वाचा: Jalgaon News : सीएसटी- दोंडाईचा एक्सप्रेस आता भुसावळपर्यंत धावणार

या प्रकरणी दिव्यांग जितेंद्रसिंग गुलझारसिंग गिरासे (रा. वलवाडी शिवार) यांनी फिर्याद दिल्यानंतर संस्थेचे मंगलसिंग गुलझारसिंग गिरासे (रा. राजपूत कॉलनी, देवपूर), एस. जी. राजपूत (रा. जीटीपी परिसर, देवपूर) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला.

तरीही दोन महिन्यांपासून पोलिसांनी संशयितांना राजकीय दबावापोटी अटक केलेली नाही. याउलट फिर्यादीला शारीरीक व मानसिक त्रास दिला. वारंवार न्याय हक्कासाठी पोलिस ठाण्यात जाऊनही प्रतिसाद दिला जात नाही. उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. तसेच गुन्हा मागे घ्यावा यासाठी संशयितांकडून दबाव आणता जातो. त्यामुळे पश्‍चिम देवपूर पोलिस ठाण्याने संशयितांना अटक केली नाही तर सोमवारपासून उपोषणाचा इशारा फिर्यादी गिरासे यांनी दिला.

हेही वाचा: Nashik News : E- Shivai धावणार नाशिक-पुणे मार्गावर!