Dhule Crime News : पोकलेनसह शेकडो ब्रास वाळूसाठाही गायब! वाळूघाटाचा ताबा पुन्हा महसूलकडे

Sub-Divisional Officer Pramod Bhamre, Tehsildar Dnyaneshwar Sapkale, Circle Officer Rohidas Koli, Circle Officer Monika Dhangar etc. Pokalen destroys the sand bank after the news was published in 'Sakal' on Saturday. In the last photograph, the boat seized by the revenue department.
Sub-Divisional Officer Pramod Bhamre, Tehsildar Dnyaneshwar Sapkale, Circle Officer Rohidas Koli, Circle Officer Monika Dhangar etc. Pokalen destroys the sand bank after the news was published in 'Sakal' on Saturday. In the last photograph, the boat seized by the revenue department.esakal

Dhule Crime News : अक्कडसे (ता. शिंदखेडा) येथील तापी नदीपात्रात येथील वाळूघाट मंजूर झाला असून, प्रत्यक्ष घाट सुरू झाला नसताना नदी पात्रात सेकेन्शन पंप व पोकॅलेनच्या सहाय्याने वाळूउपसासंदर्भात ‘वाळूघाट सुरू होण्यापूर्वी उपसा’ असे वृत्त शनिवारी (ता. ४) ‘सकाळ’मध्ये छायाचित्रासह प्रसिद्ध झाल्यानंतर महसूल विभाग खडबडून जागा झाला.( possession of Sand Ghat goes back to Revenue dhule crime news)

शनिवारी सुटीच्या दिवशी दुपारी बाराच्या सुमारास शिरपूर उपविभागीय अधिकारी प्रमोद भामरे व शिंदखेडा तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांनी घटनास्थळी जाऊन संबंधित ठेकेदाराकडे देण्यात आलेला ताबा महसूल विभागाकडे परत घेत बोट जप्त करण्यात आली. मात्र पोकलेनसह शेकडो ब्रास वाळूसाठा गायब करण्यात आला आहे.

अक्कडसे येथील तापी नदीवरील गट क्रमांक १२४ मधील ९३० लांबी, २८ रुंदी व ०.४६ खोली असे २६ हजार ४६ साठ्याचे क्षेत्रफळ असून, एकूण चार हजार २०० ब्रास एवढा साठा मंजूर करण्यात आला आहे. परभणी येथील मे अक्षद एजन्सीजला २०२३-२४ साठी अक्कडसे येथील तापी नदीपात्रातातून गाळ व गाळमिश्रित घाटांचा ई-निविदेद्वारे लिलाव देण्यात आला आहे.

अक्कडसे येथील तापी नदीवरील वाळूघाट कायदेशीर सुरू करण्यापूर्वी ठेकेदाराने शुक्रवारी (ता. ३) दुपारी नदीपात्रात एक सेकेन्शन पंप, बोट व पोकलेन वाळूउपशासाठी सुरू होते. वाळू उत्खनन मजुरांकडून केले जाते.

Sub-Divisional Officer Pramod Bhamre, Tehsildar Dnyaneshwar Sapkale, Circle Officer Rohidas Koli, Circle Officer Monika Dhangar etc. Pokalen destroys the sand bank after the news was published in 'Sakal' on Saturday. In the last photograph, the boat seized by the revenue department.
Dhule Crime News : देवपूर पोलिसांकडून दुचाकीसह तीन सायकली हस्तगत; पाठलाग करीत चोरट्याला पकडले

मात्र मशिनरीचा सर्रास वापर करण्यात येत असल्याचे वृत्त शनिवारी ‘सकाळ’ने प्रसिद्ध केल्यानंतर शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास शिरपूर उपविभागीय अधिकारी प्रमोद भामरे, शिंदखेडा तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे, शिंदखेडा शहर महसूल मंडळ अधिकारी रोहिदास कोळी, वर्शी मंडळ अधिकारी मोनिका धनगर आदींनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून ठेकेदारांना देण्यात आलेला वाळूघाटाचा ताबा परत महसूल विभागाने घेतला असून, एक बोट जप्त करण्यात येऊन अक्कडसे पोलिसपाटील यांच्या ताब्यात देण्यात आली.

''अक्कडसे येथील वाळूघाटाचा ताबा संबंधित ठेकेदाराला देण्यात आला होता. आता अटी-शर्तींची पूर्तता झाल्यानंतर ताबा संबंधित ठेकेदारला पुन्हा देण्यात येणार आहे. घटनास्थळी एक बोट जप्त करण्यात आली असून, ती पोलिसपाटलांच्या ताब्यात देण्यात आली आहे. -प्रमोद भामरे, उपविभागीय अधिकारी, शिरपूर

Sub-Divisional Officer Pramod Bhamre, Tehsildar Dnyaneshwar Sapkale, Circle Officer Rohidas Koli, Circle Officer Monika Dhangar etc. Pokalen destroys the sand bank after the news was published in 'Sakal' on Saturday. In the last photograph, the boat seized by the revenue department.
Dhule Crime News : देवपूर पोलिसांकडून दुचाकीसह तीन सायकली हस्तगत; पाठलाग करीत चोरट्याला पकडले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com