Dhule Crime News : देवपूर पोलिसांकडून दुचाकीसह तीन सायकली हस्तगत; पाठलाग करीत चोरट्याला पकडले

Suspects in custody with stolen bicycles and police officers and staff in action.
Suspects in custody with stolen bicycles and police officers and staff in action.esakal

Dhule Crime News : येथील देवपूर पोलिसांनी पाठलाग करीत दुचाकीसह चोरट्याला अटक केली. त्याच्याकडून एक दुचाकी व तीन स्पोर्टस सायकल, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

देवपूर पोलिस ठाण्याच्या शोध पथकातील अंमलदार एक नोव्हेंबरला सांयकाळी पाचच्या सुमारास पेट्रोलिंग करीत होते. (Three cycles including two wheeler were seized by Deopur police dhule crime news)

तेव्हा दत्तमंदिर चौकातून एक जण दुचाकीने भरधाव नरडाणा चौफुलीकडे संशयितरीत्या जाताना दिसला. त्यामुळे पोलिसांनी त्याचा पाठलाग करीत त्यास थांबवून विचारपूस केली. तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला.

संशय बळावल्याने त्याला ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणून चौकशी केली असता त्याने त्याचे नाव सागर मच्छींद्र पाटील (वय २७, रा. धमाणे, ता. धुळे) असे सांगितले. तसेच त्याच्या ताब्यातील दुचाकी (एमएच १५ एएल ६८१७) चोरीची असल्याची कबुली दिली.

Suspects in custody with stolen bicycles and police officers and staff in action.
Dhule Crime News : मुलींची छेडखानी महागात; देवपूरच्या घटनेप्रकरणी दोघे 6 महिने तुरुंगात

तसेच देवपूरमधील दत्त मंदिर परिसरात दोन नोव्हेंबरला सायंकाळी तीन स्पोर्ट्स सायकली चोरल्याची कबुली देत संशयिताने त्या दिल्या. त्याच्याकडून एक दुचाकी व तीन स्पोर्टस सायकली हस्तगत करण्यात आल्या. सायकली चोरीच्या गुन्ह्यास त्यास अटक करण्यात आली. हवालदार सतीष साळुंके व रवींद्र मोराणीस तपास करीत आहेत.

पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनखाली देवपूरचे प्रभारी पोलिस अधिकारी सतीश घोटेकर, राजेश इंदवे, मिलिंद सोनवणे, हवालदार पंकज चव्हाण, महेंद्र भदाणे, राहुल गुंजाळ, सागर थाटशिंगारे, सौरभ कुटे, एस. एम. गवळे यांनी ही कारवाई केली.

Suspects in custody with stolen bicycles and police officers and staff in action.
Dhule Crime News : मुलींची छेडखानी महागात; देवपूरच्या घटनेप्रकरणी दोघे 6 महिने तुरुंगात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com