
इगतपुरी : शहरातील जुना मुंबई आग्रा या मुख्य मार्गावर गेल्या दोन महिन्यांपासून होत असलेल्या जोरदार पावसामुळे मोठ मोठे खड्डे झाल्याने रस्त्याची अक्षरशा चाळण झाली असून, या मुळे वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, दरवर्षी गिरणारे ते बोरटेंभे या दरम्यान असलेल्या डांबरी रस्त्याची स्थिती खूपच विदारक असल्याने लहान मोठ्या वाहनचालकांसह नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. गेल्या पाच वर्षांपूर्वी चौदा कोटी रूपये खर्च करून हा रस्ता तयार करण्यात आला. सुमारे दोन किलोमीटर अंतराचा कॉंक्रीटिकरणचा रस्ता व दोन किलोमीटर अंतराचे डांबरीकरण करण्यात आले. या रस्त्यावर सध्या ठिकठिकाणी खड्डे तयार झाले आहेत .यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे
वाहन चालवताना तारेवरची कसरत
इगतपुरी शहरातील जुना मुंबई आग्रा मार्ग हा एकमेव मुख्य रस्ता असून या रस्त्यावर शहरवासीयांची संपूर्ण रहदारी अवलंबून आहे.पाच वर्षांपूर्वी या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले.मात्र, ठेकेदाराने रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. नवीनच केलेल्या या रस्त्याला नाली न काढल्यामुळे दरवर्षी प्रमाणे याही पावसाळ्यात बुद्धविहार, गिरणारे जवळ प्रचंड प्रमाणात पाणी साचणार आहे. तसेच खालची पेठ,बसस्टँड,रेल्वे स्टेशन नवा बाजार, राम मंदिर, तीन लाकडी या ठिकाणी तर रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. वाहन चालकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
प्रशासनाचे तक्रारींकडे दुर्लक्ष..
वाहनधारक ,विद्यार्थी ,महिला यांना खुप त्रास सहन करावा लागणार आहे.या रस्त्या विषयी अनेक तक्रारी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे करण्यात आल्या आहेत.वेळोवेळी तहसील कार्यलयात बैठकी घेण्यात आल्या असून,या रस्त्याच्या गुणवत्ते विषयी प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. याच मार्गावर तहसील कार्यालय पोलीस ठाणे ,पंचायत समिती,तालुका कृषी कार्यालय,आदी महत्वाची कार्यालये असल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे.दरम्यान,शहरात येणाऱ्या पर्यटकांना देखील मनस्ताप होत असतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.