Latest Marathi News | Sakal Impact News : महामार्गावरील खड्डे भरण्यास मिळाला मुहूर्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Employees of the department while erecting a bridge across Shantikesar Super Market.

Sakal Impact News : महामार्गावरील खड्डे भरण्यास मिळाला मुहूर्त

साक्री (जि.धुळे) : येथील राष्ट्रीय महामार्गावरील जीवघेणे खड्डे भरण्यास अखेर प्रशासनास मुहूर्त मिळाला असून, याबाबत ‘सकाळ’ ने सचित्र वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर प्रशासनास जाग येऊन खड्डे भरण्याची कार्यवाही करण्यात आली. आता केवळ खड्डे भरून जबाबदारी पूर्ण न करता रस्त्याच्या पूर्ण दुरुस्तीसाठी लवकरात लवकर प्रयत्न करण्याची गरज आहे.

येथील राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे तयार पडले होते. विशेषतः शांतिकेशर सुपर मार्केटसमोरील पुलावर तर दोन ते तीन फूट खोलीचे खड्डे तयार झाले होते. या खड्ड्यांमुळे याठिकाणी दररोज अपघाताच्या घटना घडून अनेक वाहनचालक दुखापतग्रस्त झाले होते. असे असतानाही प्रशासनाकडून याची दाखल घेतली जात नव्हती. (potholes fillings started on National Highway in Sakri by Public Works Department Dhule News)

हेही वाचा: गुटख्याची तस्करी; ट्रव्हल्ससह 76 लाखांचा माल जप्त

विशेष म्हणजे याच मार्गावरून लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी दररोज ये-जा करीत असतानाही त्यांनी या समस्येकडे लक्ष दिले नव्हते. या खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांच्या वाढत्या घटना लक्षात घेता ‘सकाळ’ने याप्रश्नी सचित्र वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले होते. या वृत्तानंतर घाईगडबडीत बुधवारी (ता. २२) खड्डे भरण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. मात्र, ही कार्यवाही तात्पुरती न राहता महामार्गावरील सर्वच खड्डे भरणे गरजेचे आहे. पावसाळा संपल्यानंतर तत्काळ या रस्त्याची पूर्ण दुरुस्ती करत नव्याने रस्ता तयार करणे गरजेचे आहे, अन्यथा पुन्हा काही दिवसांनी या रस्त्यावर खड्डे तयार होऊन समस्या जैसे थे निर्माण होणार आहे.

हेही वाचा: ऑटो एक्स्पोला उद्या प्रारंभ; मनपसंत कार व बाइक निवडण्याची संधी

Web Title: Potholes Fillings Started On National Highway In Sakri By Public Works Department Dhule News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..