latest crime news | गुटख्याची तस्करी; ट्रॅव्हल्ससह 76 लाखांचा माल जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Police officers and action team inspecting gutkha seized by LCB

गुटख्याची तस्करी; ट्रॅव्हल्ससह 76 लाखांचा माल जप्त

धुळे : येथील एलसीबीच्या पोलिस पथकाने मुंबई-आग्रा महामार्गावर गुरुवारी (ता. २२) पहाटे पाचच्या सुमारास लळिंग टोल नाक्याजवळ सापळा रचला. त्यात मध्य प्रदेशकडून धुळेमार्ग मालेगावच्या दिशेने जाणाऱ्या हंस कंपनीच्या दोन ट्रॅव्हल्स रोखल्या. या ट्रव्हल्समध्ये पाऊण कोटी किमतीचा गुटखा होता. त्यासह पथकाने दोन संशयितांना ताब्यात घेतले. (smuggling of gutka 76 lakh worth of goods seized including travels dhule crime news )

हेही वाचा: Holidays : ट्रीप झालीचं पाहिजे! ऑक्टोबरमध्ये शाळांना असणार इतके दिवस सुट्टी!

या प्रकरणी सहा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. राज्यात बंदी असलेल्या गुटखा, पान मसाल्याची परराज्यातून तस्करी होत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी एलसीबीला दिली. त्यानुसार प्रभारी पोलिस निरीक्षक सतीश गोराडे, उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी यांनी पहाटे लळिंग टोल नाक्याजवळ पथकाद्वारे सापळा रचला. मध्य प्रदेशमधील हंस ट्रॅव्हल्स कंपनीच्या दोन बसेसद्वारे पान मसालासह गुटखा मालेगावकडे विक्रीसाठी नेला जात असताना, या बसेस पोलिस पथकाने रोखल्या. चौकशीत दोन्ही ट्रॅव्हल्सच्या चालकांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

हेही वाचा: सख्खे शेजारी, पक्के चोर : पोलिसांनी केल्या 15 दुचाकी हस्तगत

पथकाने तपासणीत एनएल ०७ बी ०५४१, एनएल ०७ बी ०५४५ या क्रमांकाच्या ट्रॅव्हल्ससह ७६ लाख २८ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी वाहनचालक मोहंमद रईस गुलजार अहमद, शेख रमजान शेख शुबराती, रघुराज दुर्गा मीना, मोहंमद अशरफी अब्दुल अजीज शेख, राजेश गणेश बिसोदीया, हरी शंकर यादव (सर्व रा. मध्यप्रदेश) या सहा संशयितांविरुद्ध मोहाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिस अधीक्षक पाटील, अपर अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक गोराडे, उपनिरीक्षक सूर्यवंशी, सहाय्यक अधिकारी संजय पाटील, पथकातील कर्मचारी संदीप सरग, पंकज खैरमोडे, मयूर पाटील, महेंद्र सपकाळ, योगेश जगताप, तुषार पारधी, किशोर पाटील, सुनील पाटील यांनी ही कारवाई केली.

हेही वाचा: पोलीस कर्मचाऱ्याची गुन्हेगारांनी पकडली कॉलर

Web Title: Smuggling Of Gutka 76 Lakh Worth Of Goods Seized Including Travels Dhule Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..