धुळे- शहराच्या वीज समस्येबाबत करावयाच्या उपाययोजनांसाठी राज्य शासनासह महावितरण कंपनीकडे पाठपुरावा केला. यानंतर प्रत्यक्ष कामांना सुरुवात झाल्याची माहिती आमदार अनुप अग्रवाल यांनी दिली. .ते म्हणाले, की धुळे शहराच्या विस्तारासह विकास झपाट्याने आहे. त्यामुळे शहराला मुबलक व अखंडित वीजपुरवठा होणे गरजेचे आहे. ते लक्षात घेऊन शहरासह ‘एमआयडीसी’संदर्भात वीजपुरवठा, जुने व कमी क्षमतेचे रोहित्र बदलून अधिक क्षमतेचे नवीन रोहित्र बसविणे, इतर आनुषंगिक कामासाठी ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यांच्यासह या विभागाचे सचिव, महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक बोलाविली. .तीत धुळे शहर व एमआयडीसीबाबत वीजपुरवठ्याच्या अडचणी मांडल्या. विविध उपाययोजनांची मागणी केली. त्यानुसार राज्यमंत्र्यांनी बैठकीतील निर्णयाची अंमलबजावणी केली. या पार्श्वभूमीवर महावितरण कंपनीकडून वलवाडी शिवारातून कामाला सुरुवात करण्यात आली आहे. यात महावितरणच्या निरंतर वीज योजनेतून आता २५ ऐवजी १०० केव्ही क्षमतेचे रोहित्र बसविण्यात आले असून, इतर ठिकाणी रोहित्र बसविण्याचे काम प्रगतिपथावर असल्याचे आमदार अग्रवाल यांनी सांगितले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.