जळगाव: पुण्यातील कथित रेव्ह पार्टी प्रकरणात प्रांजल खेवलकर यांना गोवण्यात आले. त्यांना त्यात ‘ट्रॅप’ करण्यात आल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणाशी संबंधित काही बाबी तपासल्या असता, त्यात ताब्यात घेतलेल्या अन्य संशयितांसोबत खेवलकरांचे यापूर्वी कधीही संभाषण झाल्याचे दिसून येत नाही, असा दावा इथिकल हॅकर मनीष भंगाळे यांनी केला आहे.