शेतकऱ्याची निफाडच्या तहसिलदारांना आत्मदहनपूर्व नोटिस

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 मे 2018

निफाड : गेल्या दोन वर्षापासून लासलगाव मंडल अधिकाऱ्यांकडे हेलपाटे मारुनही शेत जमिनीची नोंद करत नसुन उलट गोंदेगाव (ता. निफाड) येथील राजाराम जगरुत (वय 65) या शेतकऱ्यास उद्धटपणाची वागणुक देत असल्याच्या निषेधार्थ 31 मे ला निफाड तहसिल कार्यालयात सहकुटुंब आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला आहे. या बाबत निफाडच्या तहसिलदारांना आत्मदहनपूर्व नोटिस दिली आहे.

याबाबत दिलेल्या सूचनेत म्हटले आहे की, आमची मिळकत गट क्र३२८/२/४ शेतजमिनीचे खाते वाटप १५/९/२०१६ रोजी सबरजिस्टर लासलगाव यांचेकडे दस्त क्र१५१८/२०१६ झाले आसुन सदर नोंदणी चे कागदपत्र पुढिल कार्यवाही साठी तालाठी गोंदेगाव यांचेकडे २०/९/२०१६ रोजी सपुर्द केले आहे. वरील नोंद ७/१२ वर आजतागायत झाली नाही याबाबत मंडल आधिकारी लासलगाव आणि तलाठी सजा गोंदेगाव यांच्याकडे नोंदी बाबत वेळोवेळी पाठपुरावा केला. याबात त्यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ तर केलीच परंतु नोंदीच्या अपुर्ततेबाबत कुठलीही लेखी नोटिस अथवा सूचना दिली नाही. आज दि. २९/५/२०१८ पर्यंतही याबाबत कुठल्याही प्रकारची नोंद झालेली नाही.

त्यातच तीन वर्षात माझे उत्पन्न शेतात नगण्य होत आहे. वार्षिक उत्पन्न ही नगण्यच होत असल्यामुळे माझी मानसिक स्थिती खालवली आहे. त्यातच दुष्काळात तेरावा म्हणून की, काय लासलगाव मंडल आधिकारी नोंद करण्यास विलंब करत आहे. आज माझे (वय ६५) वर्ष आसुन माझे डोळ्या देखत नोंदी बघायच्या आहेत. परंतु लासलगावचे मंडल आधिकारी सदरची नोंद करत नसल्यामुळे अखेर त्यांच्या त्रासाला कंटाळुन मानसिक त्रास सहन होत नसल्याने 31 मे ला सकाळी अकरा वाजता निफाड तहसिल कार्यालय येथे सहकुटुंब आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापूर्वी आपणास ही नोटीस देत असून मी व माझ्या कुटुंबाचे बरेवाईट झाल्यास त्यास जबाबदार लासलगाव मंडल आधिकारी राहिल असे आत्मदहनपूर्व सूचनेत म्हटले आहे.

Web Title: pre suicide note to nifad talsil officer by farmer