मालमत्ता, पाणीपट्टीसाठी जुन्या नोटा चालणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016

नाशिक - पाचशे व हजाराच्या नोटा बंद करण्याची घोषणा झाल्यानंतर महापालिकेनेही दोन दिवसांपासून मोठ्या नोटा स्वीकारण्यास मनाई केली होती. कर व वसुली थकबाकीची चांगली संधी प्राप्त झालेली वाया जाण्याची शक्‍यता निर्माण झाल्याने शासनाशी तातडीने पत्रव्यवहार करण्यात आला.

हिरवा झेंडा मिळाल्यानंतर तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी दिल्या आहेत. या निमित्ताने पालिकेच्या महसुलात वाढ तर होईलच. शिवाय थकबाकीदारांचा बोजाही उतरेल. हातोहात पाचशे व हजाराच्या नोटा खपणार असल्याने हा योग साधण्यासाठी पालिकेच्या वसुली केंद्रांवर गर्दी होणार आहे.

मालमत्ता व पाणीपट्टीची देयके ग्राहकांच्या हाती पडली आहेत. पण मोठ्या रकमेच्या नोटा बंद झाल्याने ऑनलाइन कर भरण्याशिवाय पर्याय नाही.

महापालिकेतर्फे बुधवारी नोटा स्वीकारल्या जाणार नसल्याचा फलक लावल्यानंतर अनेक करदात्यांना परतावे लागले होते. महापालिकेच्या रकमेचा भरणा थेट बॅंकेत जमा होत असल्याने पाचशे व हजाराच्या नोटा स्वीकारण्यास हरकत नसल्याचे पत्र प्राप्त झाल्यानंतर शुक्रवारी (ता. ११) रात्री बारापर्यंत कर वसुलीचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत कुठलीही अट न ठेवता कर भरता येईल, असे आयुक्त कृष्णा यांनी स्पष्ट केले.

काउंटर वाढविणार
पाचशे व हजाराच्या जुन्या नोटा स्वीकारण्याचा निर्णय झाल्याने त्या प्रमाणात गर्दीदेखील होणार असल्याने पालिकेने सहाही विभागांत कर भरण्यासाठी काउंटर उपलब्ध करून दिले आहे. कर्मचारी वाढविले जाणार असून, स्वतः अधिकारी व आयुक्त काउंटरला भेटी देणार आहेत. या निमित्ताने महापालिकेची जुनी थकबाकीसुद्धा वसूल होणार असल्याने महसुलात भर पडणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: property, water rate for the work of the old currency