Illegal Arms Factory
sakal
शिरपूर: अवैध शस्त्रनिर्मिती कारखान्यांमुळे कुप्रसिद्ध असलेल्या उमरठी (ता. वरला, जि. बडवानी, मध्य प्रदेश) येथे पुणे पोलिसांनी शनिवारी (ता.२२) पहाटे छापा ठाकला. मध्य प्रदेशातील एटीएस पथकासह सुमारे २५० पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या पथकाने दिवसभर गाव पिंजून काढत अर्धवट तयार केलेला मोठा शस्त्रसाठा जप्त केला. या कारवाईत दहापेक्षा अधिक जणांना ताब्यात घेतले असून, अटकसत्र उशिरापर्यंत सुरू होते.