Dhule News : वाहकासह प्रवाशाच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! बसमध्ये विसरलेली पर्स केली परत

Purse forgotten in bus returned by passenger and driver dhule news
Purse forgotten in bus returned by passenger and driver dhule newsesakal
Updated on

Dhule News : जळगाव-दोंडाईचा बसने प्रवास करणारी महिला आपली पर्स बसमध्ये विसरली असता प्रवासी अरविंद पाटील व वाहकाने ही पर्स प्रामाणिकपणे परत केली.

तावखेडा येथील प्रेरणा पाटील अमळनेर येथून दोंडाईचा बस (एमएच १४, एन ९०३०)ने प्रवास करीत असताना नरडाणा येथे उतरल्या असता त्या पर्स बसमध्ये विसरल्या. (Purse forgotten in bus returned by passenger and driver dhule news)

या बसने प्रवास करणारे अरविंद पाटील यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी वाहक आरती पंडित शिरसाठ यांच्याकडे पर्स सुपूर्द केली.

या वेळी लक्षात आले की नरडाणे येथे काही प्रवासी महिला उतरल्या व त्यांच्यापैकी महिला पर्स विसरल्या असतील. त्या वेळी अरविंद पाटील (कमखेडा) यांनी नरडाणा येथील कृषिधन ॲग्रोचे संचालक प्रशांत जाधव यांना फोन करून नरडाणा येथे बसथांब्यावरील कोणीतरी महिला पर्स विसरल्याचे तपास करण्यास सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Purse forgotten in bus returned by passenger and driver dhule news
Dhule Agriculture News : पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यात भातलागवडीस प्रारंभ; चिखलणी करून भातरोपणी

श्री. जाधव यांनी बसथांब्यावर जाऊन चौकशी केली असता पर्सच्या मालक तावखेडा (ता. शिंदखेडा) येथील प्रेरणा भटू पाटील असल्याचे निष्पन्न झाले.

त्यांना शिंदखेडा बसस्थानकात आरती शिरसाठ यांनी शिंदखेडा आगार व्यवस्थापक प्रमोद चौधरी, वाहतूक निरीक्षक प्रीती पाटील, राकेश पवार यांच्या उपस्थितीत परत करण्यात आली. अरविंद पाटील व वाहक आरती शिरसाठ यांच्या प्रामाणिकपणाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

Purse forgotten in bus returned by passenger and driver dhule news
Dhule Shasan Aplya Dari : विद्यार्थ्यांची चुकली शाळेची वारी..! बसच्या व्यस्ततेमुळे प्रवाशांचे हाल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.