साकुरच्या आदिवासी युवकांनी आर्थिक योगदानातून उभारले राघोजी भांगरे यांचे स्मारक

विजय पगारे
गुरुवार, 17 मे 2018

इगतपुरी : आदिवासी बांधवांनी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या कार्याची प्रेरणा घेतल्यास जीवनाला नवी दिशा मिळेल असे प्रतिपादन आदिवासी विकास परिषदेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष लकी जाधव यांनी केले. इगतपुरी तालुक्यातील साकुर गावात आदिवासी युवकांनी स्वतःचे आर्थिक योगदान देऊन आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे स्मारक उभारल्याने त्यांचे कौतुक करताना ते बोलत होते.

गावातील आदिवासी एकता ग्रुपचे युवक दत्ता आवारी, बापू आवारी, गोरख आवारी, संकेत आवारी, शुभम आवारी, सदानंद आवारी, सुनील बेंडकोळी, भरत आवारी या आदिवासी सर्व तरुणांनी एकत्र येत मनात कल्पना येताच त्यांनी राघोजी भांगरे यांची भव्य मूर्ती बनवून स्मारक उभारले. या स्मारकाचे आज अनावरण करण्यात आले.

विशेष म्हणजे इगतपुरी तालुक्यात पहिलेच स्मारक ठरले आहे, दरम्यान राघोजी भांगरे यांच्या मूर्तीची भव्य रथात शोभायात्रा काढत जोरदार स्वागत करण्यात आले. महिलांनी अंगणात रांगोळीचे सडे टाकले होते. त्यानंतर आदिवासी विकास परिषदेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष लकी जाधव, संभाजी ब्रिगेडचे उपजिल्हाप्रमुख मनोज सहाणे यांच्या हस्ते आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे यावेळी पूजन करण्यात आले. व्याख्याते भाऊसाहेब नेहरे यांनी व्याख्यानातून आदिवासी बांधवांमध्ये जनजागृती केली.

याप्रसंगी गंगाराम तळपाडे, अशोक जाखेरे,राजू लोहरे,विनायक भले, तुकाराम वारघडे,काळू भांगरे,बाळा डहाळे ,संपत रोंगटे,भावराव रोंगटे, ग्रामपंचायत सदस्य तुकाराम सहाणे, शिवाजी सहाणे,संजय सहाणे,ईश्वर सहाणे,भाऊसाहेब आवारी,शांताराम आवारी,भगवान आवारी,विठ्ठल आवारी,दत्ता आवारी,मुकुंद सहाणे,दगडू साळवे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. 
 
Web Title: Raghoji Bhangre built by contributing financially to the tribal youth of Sakur