धुळे : शेतकऱ्याच्या एका डोळ्यात 'हसू' तर दुसऱ्या डोळ्यात 'आसू'

सुधाकर पाटील
बुधवार, 12 जून 2019

उकाळ्याने हैराण झालेल्या नागरीकांना आज पाऊस बरसल्याने दिलासा मिळाला आहे. विजाच्या कडकडाट व वादळासह पावसाने हजेरी लावली. भडगाव शहरासह ग्रामीण भागात पावसाचे आगमन झाले. पावसामुळे पुर्व हंगामी कापुस व ऊस पिकाला मोठा फायदा झाला. त्यामुळे शेतकऱ्यामध्ये आनंद पहायला मिळाला. अनेकांनी पावसाच्या भरोश्यावर व विहीरीत साठवलेल्या पाण्यावर कापसाची लागवड केली होती. पण पाऊस लांबल्याने हे शेतकरी अडचणीत आले होते. आज पडलेल्या पावसाने त्यांना मोठा आधार मिळाला आहे. 

भडगाव : शहरासह तालुक्यात आज विजाच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. पावसामुळे काही शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तर वादळामुळे केळी झोपुन गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या एका डोळ्यात 'हसु' तर दुसऱ्या डोळ्यात 'आसू' पहायला मिळाले. 

शहरासह तालुक्यात आज दुपारी चार वाजेच्या सुमारास पावसाने वादळ वाऱ्यासह विजाच्या कडकडाटाने आगमन झाले. शहरात पावसाचा शिडकावा झाला. मात्र ग्रामीण भागात पावसाने अक्षरशः झोडपुन काढले. अनेक भागात वादळामुळे झाडे उन्मळून पडले. 

पावसाने दिलासा
उकाळ्याने हैराण झालेल्या नागरीकांना आज पाऊस बरसल्याने दिलासा मिळाला आहे. विजाच्या कडकडाट व वादळासह पावसाने हजेरी लावली. भडगाव शहरासह ग्रामीण भागात पावसाचे आगमन झाले. पावसामुळे पुर्व हंगामी कापुस व ऊस पिकाला मोठा फायदा झाला. त्यामुळे शेतकऱ्यामध्ये आनंद पहायला मिळाला. अनेकांनी पावसाच्या भरोश्यावर व विहीरीत साठवलेल्या पाण्यावर कापसाची लागवड केली होती. पण पाऊस लांबल्याने हे शेतकरी अडचणीत आले होते. आज पडलेल्या पावसाने त्यांना मोठा आधार मिळाला आहे. 

केळीचे मोठे नुकसान 
एकीकडे पावसाच्या आगमनाने शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर 'हसु' पहायला मिळाले. तर दुसरीकडे वादळामुळे केळीचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे त्या शेतकऱयाच्या चेहऱ्यावर 'आसू ' पहायला मिळाले. ऐन कडक उन्हाळ्यात विकत चे पाणी घेऊन शेतकर्यानी केळीचे पीक जतन केले होते. मात्र आजच्या वादळाने हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हीरावून् नेल्याने केळी उत्पादक शेतकऱ्याच्या डोळ्यात आडवा पडलेला केळीचा बाग पाहून अश्रू नी घर केले होते. दुष्काळाने होरपळेला शेतकऱ्याच्या वाट्याला जेमतेम पाण्यावर मोठ्या कसरीतीने जतन केलेले पीक वादळाने गिळल्याने शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. वडजी गावातील कांतीलाल परदेशी यांनी मोठ्या कष्टाने जतन केलेला बाग उध्वस्त झाला. तीच परीस्थिती पिचर्डे, बात्सर, पाढंरद व इतर भागात आहे. प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी अनुदान वितरीत करावे अशी मागणी शेतकर्याकडुन करण्यात आली आहे.  

दुष्काळात तेरावा महीना....
गेल्या वर्षी अत्यल्प पावसाने खरीप हंगाम पुरता कोलमडला.तर विहरीमधे ठणठण गोपाला असल्याने रब्बी हंगामाचेही बारा वाजले. त्यामुळे शेतीची पुरती म्हसणवटी झाली होती. मात्र काही शेतकर्यानी जुगार खेळत थोड्याफार पाण्याच्या फरवश्यावर पीक घेण्याचा डाव खेळला. त्याने अनेक शेतकर्याचे पीक पाण्याअभावी सोडुन द्यावी लागली. तर काहीनी मोठ्या कष्टाने पीक वाचविले. मात्र पहील्याच वादळी पावसाने केळीचे पीक जमीनदोस्त केले. त्यामुळे उरले सुरले शेतकरी ही निसर्गाच्या चक्रव्युव्हातुन वाचु शकला नाही. 

भडगाव तालुक्यात आज झालेल्या वादळी पावसामुळे वडजी, पिचर्डे, पाढंरद, बात्सर, निभोंरा, कनाशी, बोदर्डे आदि गावात संपुर्ण केळी बागा जमीनदोस्त झाल्या. त्यामुळे दुष्काळात तळ हाताच्या फोडाप्रमाणे जतन केलेल्या बागा आडव्या पडल्याने शेतकरीही उध्वस्त झाला आहे. त्यामुळे प्रातांधिकारी, तहसीलदार, कृषीअधिकारी यांना तत्काळ पंचनामे करण्याबाबत सुचना केल्या आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई मिळण्याबाबत पाठपुरावा करू.
- किशोर पाटील आमदार पाचोरा-भडगाव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rain in bhadgaon Dhule