'गिरणा' धरणाच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ

सुधाकर पाटील
रविवार, 4 ऑगस्ट 2019

नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस होत असल्याने गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील धरणातुन गिरणा धरणात मोठ्याप्रणात पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ होतांना दिसत आहे. सकाळी सहा वाजेपर्यंत गिरणा प्रकल्पात 12.86 टक्के होता.

भडगाव - नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस होत असल्याने गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील धरणातुन गिरणा धरणात मोठ्याप्रणात पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ होतांना दिसत आहे. सकाळी सहा वाजेपर्यंत गिरणा प्रकल्पात 12.86 टक्के होता. 

निम्म्या जळगाव जिल्ह्याची पिण्याच्या व शेतशिवाराची तहान भागविणार्या गिरणा धरणाच्या जलसाठ्यात कालपासुन मोठ्याप्रणात वाढ होत आहे. आज कालपेक्षा पाण्याचा फ्लो वाढलेला आहे. त्यामुळे पुढच्या दोन दिवसात गिरणा धरणाचा पाणीसाठा 20 टक्के पर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. आज सकाळी नऊ वाजता चणकापुर धरणातुन 14547, पुनद मधुन 7478 क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू होता. मात्र ठेंगोळा बंधार्यात हे पाणी अद्याप पोहचले नव्हते. त्यामुळे ठेंगाळा बंधार्यातुन सकाळी नऊ वाजता 9740 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता. त्यामुळे दुपारनंतर ठेंगोठ्यातुन पाण्याचा विसर्ग 22-25 हजार क्युसेसने होईल. तर हरणबारी धरणातुन 6920 क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू होता. म्हणजे धरणात सायकांळी पर्यंत 30 हजार क्युसेसने पाणी येणार आहे. त्यामुळे धरणाचा पाणीसाठ्यात उद्या मोठी वाढ झालेली पहायला मिळेल असे गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता धर्मेंद्रकुमार बेहरे यांनी 'सकाळ'शी बोलतांना सांगीतले.

दरम्यान गिरणा धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असल्याने गिरणा पट्ट्यात शेतकर्यामधे आनंदाचे वातावरण पहायला मिळत आहे. 

गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पुनद प्रकल्पातुन होत असलेला पाण्याचा विसर्ग


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain Water Girna Dam Water Storage