
रब्बीची आशा असताना हातात आलेला घास गारपीट व अवकाळी पावसामुळे हिरावला गेला आहे.
सरकारने तत्काळ मदत देण्याचा निर्णय घ्यावा
धुळे ः गारपीट व अवकाळी पावसामुळे कापणीवर आलेली रब्बी पिके पूर्णपणे वाया गेली आहेत. अशा काळात सरकारने तत्काळ मदत देण्याचा निर्णय घ्यावा अन्यथा विधिमंडळाच्या येत्या अधिवेशनात आम्ही सरकारला धारेवर धरू असा इशारा माजी मंत्री तथा शिंदखेडा मतदारसंघाचे आमदार जयकुमार रावल यांनी दिला.
आवर्जून वाचा- बापरे ! बँकतील कर्मचाऱ्यांना झाला कोरोना; आणि शहरात उडाली एकच खळबळ
गुरुवारी सायंकाळी झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे पिकांचे नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार श्री. रावल यांनी जिल्हाधिकारी संजय यादव यांच्याशीदेखील दूरध्वनीद्वारे चर्चा करून पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. तसेच जिल्ह्यातील वस्तुस्थिती सरकारला कळवावी अशीही मागणी केली. याबाबत आमदार रावल म्हणाले की, गेल्या वर्षभरात शेतकरी अत्यंत अडचणीत आला आहे. सुरुवातीला कोरोनाच्या काळात शेतमालाला भाव मिळाला नाही तर यावर्षी बोंडअळीमुळे कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले. आता रब्बीची आशा असताना हातात आलेला घास गारपीट व अवकाळी पावसामुळे हिरावला गेला आहे, अशा वेड् राज्य सरकाचे प्राधान्य शेतकरी असले पाहिजे. मात्र वेगळाच पराक्रम सरकार मधील मंत्री करत असल्याची टिका श्री. रावल यांनी केली.
वाचा- अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना रडवले
एकदा ही मदत नाही
२०१४ ते २०१९ पर्यंत तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये शेतकरी अडचणीत आल्यावर त्यांना तातडीने अर्थसाहाय्य द्यायची पद्धत होती. मात्र विद्यमान तिघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून आमच्या शिंदखेडा मतदारसंघात एकदाही शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली नाही. तात्काळ मदत न मिळाल्यास येत्या अधिवेशनात सरकारला धारेवर धरू असा इशाराही आमदार रावल यांनी दिला.
संपादन- भूषण श्रीखंडे
Web Title: Rains Marathi News Dhule Untimely Rains Damage Agriculture Announce Help
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..