esakal | सोशल मीडियावर राज ठाकरे ट्रोल, कार्यकर्त्यात रंगली खेचाखेची 
sakal

बोलून बातमी शोधा

Raj Thackeray Trolled by users of Social Media

'भक्त आंधळे नव्हते तर भक्तांना दोष देणारे रातांधळे होते' असा युक्तिवाद आज इतक्या दिवस हिणवल्या गेलेल्या मोदी समर्थकांनीकरून विरोधकांची बोलती बंद केली.

सोशल मीडियावर राज ठाकरे ट्रोल, कार्यकर्त्यात रंगली खेचाखेची 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

लोकसभा 2019
येवला : इतके दिवस सोशल मीडियावर राज ठाकरेंच्या 'लाव रे तो व्हिडिओ..' या वाक्याची मोठी चर्चा होती. आज निकालानंतर पुन्हा एक वाक्य जोरदारपणे चर्चेला आले ते म्हणजे बंद कर रे तो व्हिडीओ (टीव्ही)..! सोशल मीडियावर मोदी भक्तांनी या वाक्याच्या माध्यमातून दिवसभर राज ठाकरे यांचा सर्वाधिक समाचार निकालानंतर घेतलेला दिसला. 

सकाळी जसजसे उमेदवारांचे मताधिक्य वाढत गेले आणि लोकसभेत भाजपा मित्रपक्षांची बहुमताकडे आकडे टीव्हीच्या स्क्रीनवर दिसू लागले तसतसे सोशल मीडियावर समर्थकांची देखील एकमेकांची खेचाखेची सुरू झाली. विशेषता मोदी भक्तांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मित्र असलेल्या कार्यकर्त्यांना जोरदारपणे प्रश्नावली करत चांगलेच सतावले. दिवसभर एकमेकांना ट्रोल करण्याच्या प्रकारामुळे सोशल मीडिया अधिकच चर्चेत राहिला.

'भक्त आंधळे नव्हते तर भक्तांना दोष देणारे रातांधळे होते' असा युक्तिवाद आज इतक्या दिवस हिणवल्या गेलेल्या मोदी समर्थकांनीकरून विरोधकांची बोलती बंद केली. 'काँग्रेस...भुर्रर्र...या दोनच शब्दातून भावना व्यक्त करतांना आमचा टीव्ही पण हॅक झाला वाटतं... रिमोटचं कुठलंही बटन दाबलं तरीही भाजपच आघाडीवर दिसतंय..' या गुगलीतून ईव्हीएमला दोष देणाऱ्यांना कार्यकर्त्यांनी गंमतीदार उत्तर दिले. 'दिंडोरीतून भाजपाच्या भारती पवार विजयी झाल्यावर भक्तांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना उद्देशून 72 हजारांवर पाणी सोडणाऱ्या सर्व मतदारांना विजयाच्या हार्दिक शुभेच्छा!' अशा अनोख्या शुभेच्छा दिल्या.

सर्वात जास्त काळ भावी पंतप्रधान पदावर राहिलेली व्यक्ती म्हणून पवार साहेबांचं नाव गिनीज बुक मधे नोंद केलं जाणार...शरद पवार पोरं घेउन कृष्णकुंज वर दाखल, माझे पैसे परत दे रे भो..! तसेच आपले लाडके साहेब घरातूनच आघाडीवर..यातूनही पवार-ठाकरे यांना ट्रोल करण्यात आले.
राहुल गांधी यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला..पराभव मान्य करून तो स्वीकारणे याला म्हणतात, 'मन जिंकलं भावा'. या संदेशातून काँग्रेस कार्यकर्ते स्वतचे समाधान करतांना दिसले. यापेक्षा एक्झिट पोलचे आकडेच बरे होते.

विरोधक तसेच नागरिक शास्त्रात हे शिकलो होतो की सगळे खासदार मिळून पंतप्रधान बनवतात... पण 2019 मध्ये एका पंतप्रधानाने सगळे खासदार बनवलेत... अशी स्तुतिसुमने समर्थकांनी उधळवली. सायंकाळी अख्ख्या सोशल मीडियाचे लक्ष औरंगाबादकडे लागलेले दिसले. शेवटी तेल ही गेले, तूपही गेले, हाती आले धुपटने असे वर्णन खैरे-जाधव यांच्या लढतीबाबत करण्यात आले.

loading image