धुळे- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून रमाई आवास योजनेच्या लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी पहिला हप्ता वितरित करण्यात येत आहे. एकूण ६९५ लाभार्थ्यांसाठी एकूण आठ कोटी ६८ लाख रुपये निधी प्राप्त असून, लाभार्थ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी एक लाख २५ हजारांचा हा हप्ता जमा होईल, अशी माहिती महापालिकेतर्फे देण्यात आली.