Dhule News : भडणेतील रामलीला महोत्सवात मुस्लिम बांधवांकडून पूजन! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Yusuf Pinjari during the Aarti of Prabhu Shriram and Sitamai in Ramlila Mahotsav.

Dhule News : भडणेतील रामलीला महोत्सवात मुस्लिम बांधवांकडून पूजन!

कापडणे (जि. धुळे) : भडणे येथे रामलीला (Ramlila)महोत्सव सुरु आहे. अयोध्येतील दहा कलाकारांचा समूह दरवर्षी रामलीला सादर करण्यासाठी राज्यभर फिरत याठिकाणी येतात. भडणे येथे दहा दिवसीय महोत्सव सुरु आहे. (Ramlila Festival aarti by muslim person Yusuf Pinjari dhule news)

यंदा प्रथमच आरतीचा मान मुस्लिम बांधव युसूफ पिंजारी यांनी मिळविला. अन चैत्र महोत्सव आणि रमजानच्या महिन्यात हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक पाहायला मिळाले.

कलाकार रामायणातील प्रसंग हुबेहुब सादर करीत आहेत. गीतांच्या, संवादाच्या आणि युद्धाच्या प्रसंगातून ग्रामस्थांना मंत्रमुग्ध करीत आहेत. दररोज रामलीला प्रारंभ प्रसंगी प्रभू श्रीराम आणि सीतामाईची आरती होत आहे.

भडणे समाजकारण व राजकारणात अग्रेसर आहे. त्याचप्रमाणे धार्मिक क्षेत्रातही अग्रेसर आहे. सुमारे साडेचार हजार लोक वस्तीत अठरा जाती जमातीचे लोक गुण्या गोविंदाने राहतात. वर्षाभरातून दरवर्षी चार ते पाच धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन ग्रामस्थ करतात.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

यंदा उत्तर प्रदेशातील अयोध्या नगरीतील दहा कलाकार रामलीला महोत्सव सादर करीत आहेत. त्यांना ग्रामस्थ भरीव मदत करीत आहेत. विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या प्रांगणात रात्री आठ ते दहा या वेळेत महोत्सव होत आहे.

रामलीला कथेत श्रीराम, लक्ष्मण व सीता यांच्या आरती व पूजनाचा मान प्रत्येकाला दिला जात आहे. यावेळी प्रथमच युसूफ पिंजारी यांना हा मान मिळाला. राम कथेतून हिंदू मुस्लिम एकजुटीचे दर्शन दिसून आले.