धुळे- रमजानच्या आगमनानंतर शहरातील बाजारपेठेत चैतन्य संचारले आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रा रोडसह पाचकंदिल परिसर, मौलवी गंज, अकबर चौक, काजी प्लॉट, प्रभाग क्रमांक १२, ऐंशीफुटी रोड, वडजाई रोड, देवपूरसह अन्य ठिकाणची बाजारपेठ गजबजली आहे. यात खाद्यपदार्थांचे विविध स्टॉल लावण्यात आले आहेत. उपवासाला पेंडखजुराचे महत्त्व आहे. बाजारात १०० ते एक हजार ६०० रुपये किलोपर्यंत पेंडखजूर विक्रीस आल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.