Nandurbar News : बाटलीबंद पाण्याच्या जमान्यात हरवली पाणपोई!

Ranjan panpoi and maath on way to extinction
Ranjan panpoi and maath on way to extinctionesakal

Nandurbar News : काही वर्षांपूर्वी उन्हाळा सुरू झाला की येणाऱ्या, जाणाऱ्याची तहान भागविण्यासाठी काही सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती स्वखर्चाने पाणपोई सुरू करत असे; परंतु सध्याच्या काळात पाण्याचा व्यवसाय सुरू झाला असून, आता पाणपोईऐवजी रस्त्यालगत प्रत्येक ठिकाणी बाटलीबंद पाणी विकत मिळू लागल्याने बाटलीबंदच्या जमान्यात पाणपोई हरवली आहे. त्यामुळे मातीपासून बनविलेले रांजण, माठ लुप्त होण्याच्या मार्गावर दिसून येत आहेत. (Ranjan panpoi and maath on way to extinction nandurbar news)

तहानलेल्याची तहान भागविणे ही आपली संस्कृती आहे. काही वर्षांपूर्वी सामाजिक संस्था, संघटना, सामाजिक कार्याची जाण ठेवत रस्त्यालगत, बसस्टॉप अथवा सार्वजनिक ठिकाणी पाणपोई उभारून वाटसरूंची तहान भागत असे. उन्हाळ्यात यावर अधिक भर दिला जात असे.

कारण काही वर्षांपूर्वी बाटलीबंद पाण्याचा फारसा प्रचार, प्रसार झालेला नव्हता, मात्र अलीकडे दहा ते वीस रुपयांपर्यंत पाण्याची बाटली रस्त्यावर कुठेही सहज उपलब्ध होऊ लागल्याने तहान भागविण्यासाठी वाटसरूंकडून साध्या पाण्याऐवजी बाटलीबंद पाणी खरेदी केली जात आहे.

त्यामुळे पाणपोईची पद्धत मागे पडू लागली आहे, तर पाणपोईवर पाणी पिणेही काहींना कमीपणाचे वाटू लागले आहे. हॉटेलमध्ये बाटलीबंद पाणी विकत घेऊन ते पिणाऱ्यांची संख्या वाढली आहे; परंतु ज्यांना बॉटल घेणे शक्य नाही अशा गोरगरीब, सामान्यांचे हाल होत आहेत.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Ranjan panpoi and maath on way to extinction
Unseasonal Rain : नाशिक जिल्ह्यात गारांसह अवकाळी पाऊस बरसला, शेतकऱ्यांच्या हाताशी आलेला घास हिरावला

त्यामुळे विविध सामाजिक संघटना, मंडळे, दानशूर व्यक्ती, संस्था यांनी पुढाकार घेऊन पाणपोई पुन्हा सुरू करण्यासाठी पुढे सरसावून तहानलेल्यांना पाणी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. काही वर्षांपूर्वी घरातून बाहेर पडल्यानंतर रस्त्यालगत माठ, रांजण, त्यावर लालभडक रंगाचे ओले कापड तसेच ग्लास याप्रमाणे पाणपोईची व्यवस्था रस्त्यावर दिसून येत होती.

मातीच्या रांजण, माठामधील नैसर्गिक पद्धतीने थंड झालेले पाणी पिऊन तहान भागायची परंतु कालांतराने बदलत्या जमान्यात पाणीपोईची जागा थंड पाण्याच्या जारने घेतली आणि आता मातीच्या रांजण, माठाचा उपयोगदेखील कमी झाला आहे.

जागरूक संघटनांचे उपक्रम सुरू

सध्या पाणपोई कुठेतरी चुकून नजरेस पडते, नजरेत आली तर तिथे माठात पाणी शिल्लक नाही, राहिले तर कोमट अवस्थेत अथवा उन्हात अशी परिस्थिती सध्या आहे. तसेच आजही काही जागरूक संघटनांमार्फत सार्वजनिक ठिकाणी पाणपोई उभारून वाटसरूंची तहान भागविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र त्याचा लाभ निवडकच तहानलेले घेताना दिसून येते.

Ranjan panpoi and maath on way to extinction
Unseasonal Rain : अवकाळीने चुकविले बळीराजाचे गणित; रब्बी हंगामातील पिकावर परिणाम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com