Crime News : राज्यात महिलांची सुरक्षा वाऱ्यावर? बलात्काराच्या घटनांमध्ये तीन वर्षांत २३ टक्के वाढ
Rape Cases Rising Across Maharashtra, NCRB Data Reveals : एनसीआरबीच्या ‘क्राइम इन इंडिया’ अहवालानुसार राज्यात महिलांवरील बलात्काराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, जळगाव जिल्ह्यात तीन वर्षांत १४१ प्रकरणांची नोंद झाली आहे.
जळगाव: राज्यात महिलांवरील बलात्काराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. मागील तीन वर्षांत सातत्याने वाढ होत असल्याचे राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभाग (एनसीआरबी-क्राइम इन इंडिया रिपोर्ट) च्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.