Dasara Festival Dhule: दसऱ्यानिमित्त आज रावण दहन

दसऱ्यानिमित्त साक्री रोडवरील गुरुनानक सोसायटीतील गुरु नानक मित्र मंडळाने तयार केलेली ६१ फुटी रावणाची प्रतिकृती.
दसऱ्यानिमित्त साक्री रोडवरील गुरुनानक सोसायटीतील गुरु नानक मित्र मंडळाने तयार केलेली ६१ फुटी रावणाची प्रतिकृती. esakal

धुळे : दसऱ्यानिमित्त येथील साक्री रोडवरील गुरुनानक सोसायटीत यंदाही रावण दहनाच्या कार्यक्रमाचे आकर्षण असेल. बहावलपुरी समाज आणि गुरु नानक मित्र मंडळाच्या माध्यमातून हा सोहळा पार पडतो.(Ravana Dahan today on occasion of Dasara 2022 dhule latest news)

दसऱ्यानिमित्त साक्री रोडवरील गुरुनानक सोसायटीतील गुरु नानक मित्र मंडळाने तयार केलेली ६१ फुटी रावणाची प्रतिकृती.
Dasara Festival Shopping : ई-वाहनाला पसंती, आज साधणार खरेदीचा मुहूर्त

मंडळाने यंदा तब्बल ६१ फुटी रावणाची प्रतिकृती साकारली आहे. याबाबत तयारी पूर्ण झाली असून बुधवारी (ता. ५) रात्री आठला गुरुनानक सोसायटीतील मैदानावर मान्यवरांच्या हस्ते रावण दहन होईल. नागरिकांना उपस्थितीचे आवाहन समस्त बहावलपुरी समाज आणि गुरुनानक मित्र मंडळाने केले.

तसेच धीरज परदेशी व मित्र परिवारातर्फे नवचंडी नवरात्र उत्सव समितीतर्फे बुधवारी रावण दहन होईल. चाळीसगाव रोड परिसरातील जळगाव जनता बँक कॉलनीत रात्री आठला हा कार्यक्रम होईल. उपस्थितीचे आवाहन श्री. परदेशी यांनी केले. चितोड रोडवरील मनपा शाळा क्रमांक २८ च्या मैदानावर जय मल्हार मित्र मंडळातर्फे बुधवारी रात्री आठला रावण दहन होईल.

दसऱ्यानिमित्त साक्री रोडवरील गुरुनानक सोसायटीतील गुरु नानक मित्र मंडळाने तयार केलेली ६१ फुटी रावणाची प्रतिकृती.
Dhule: 150 वर्षांची परंपरा असलेल्या रथोत्सवास उद्यापासून शिरपुरात सुरवात!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com