पोलिस पाहताच रिक्षा गल्लीत पळाली सुसाट ; दारु घेऊन जाणाऱ्या तिघांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 मे 2020

रामानंदनगर पोलिस ठाण्यातील कर्मचारी लॉकडाऊन उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईसाठी दुपारी गस्तीवर होते. दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास सागरपार्क मैदाना कडून येणाऱ्या रिक्षा चालकाने पोलिसांना बघताच वाहन गल्लीत वळवून सुसाट वेगात पळ काढला.

जळगाव :- पोलिस ठाण्याच्या हद्दीत नियमित गस्तीवर असलेल्या पोलिसांना बघताच रिक्षाचालकाने वाहन वाळून सुसाट पळ काढल्याने पोलिसांचा संशय बळावला. पाठलाग करून रिक्षा अडवल्यावर त्यात 31 हजार 320 रुपयांचा मद्यसाठा आढळून आला. चालकासह तिघांना पोलिसांनी अटक केली असून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. आजपासून पुन्हा वाईनशॉप बंद होणार असल्याच्या वृत्ताने ब्लॅकने विक्रीसाठी हा मद्यसाठा नेत असल्याचे अटकेतील संशयितांनी सांगितले. 

रामानंदनगर पोलिस ठाण्यातील कर्मचारी लॉकडाऊन उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईसाठी दुपारी गस्तीवर होते. दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास सागरपार्क मैदाना कडून येणाऱ्या रिक्षा चालकाने पोलिसांना बघताच वाहन गल्लीत वळवून सुसाट वेगात पळ काढला. सहाय्यक निरीक्षक सुहास राऊत, फौजदार गोपाळ चौधरी, विलास पवार, जयंत कुमावत, नितीन अत्तरदे, नीलेश दंडगव्हाळ अशांनी ऑटोरिक्षा(एम.एच.19 व्ही.3476)चा पाठलाग करून अरुंद गल्लीत रिक्षा अडवली असता, चालकासह दोन तरुण रिक्षात आढळून आले चौकशी करून रिक्षाची झडती घेतल्यावर आत विदेशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या.मद्य वाहतुकीचा पास परवाना नसताना विदेशी ब्रॅण्डच्या लहान मोठ्या अशा 31 हजार 320 रुपयांच्या दारूच्या बाटल्या आढळून आल्या. रिक्षाचालक शेख निजामुद्दीन शेख कुतबोद्दिन (वय 33 रा. तांबापुरा), राकेश धनराज हटकर (वय-21), रवींद्र राजू हटकर (वय-30) दोघे रा. तांबापुरा अशांना ताब्यात घेण्यात आले आहे. सहाय्यक फौजदार विलास पवार यांच्या फिर्यादीवरून तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the rickshaw fled into the galley