रिद्धीच्या उपकरणाची राष्ट्रीय इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनासाठी निवड

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 फेब्रुवारी 2019

सटाणा - येथील बागलाण एज्युकेशन सोसायटी संचलित बेस्ट इंग्लिश मिडियम स्कूलच्या रिद्धी रमाकांत भामरे या विद्यार्थिनीच्या उपकरणास आज बुधवार (ता.६) रोजी सांगली येथे झालेल्या राज्यस्तरीय इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक मिळाला आहे. त्यामुळे तिची दिल्ली येथे होणार्‍या आगामी राष्ट्रीय इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. या प्रदर्शनात तिला राजधानी दिल्लीत नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करण्याचा बहुमान मिळाला आहे.  

केंद्र व राज्य शासन तसेच राज्यातील नामवंत विज्ञान संस्थांच्या संयुक्त विद्यमाने सांगली जिल्ह्यातील पेठनाका येथील नानासाहेब महाडीक आभियांत्रिक महाविद्यालयात आठव्या राज्यस्तरीय इन्स्पायर अवार्ड प्रदर्शनाचा आज बुधवार (ता.६) रोजी समारोप झाला. या राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी शाळेतील चार उपकरणांची निवड झाली होती. प्रदर्शनात शाळेच्या रिद्धी भामरे हिने ‘रोबोटिक फायर’, हर्ष पाटील याने ‘औद्यागिक धूरापासून हवेचे शुद्धीकरण’, स्वराज अंधारे याने ‘प्लास्टीक विटा आणि इतर बांधकाम साहित्य’, कुणाल शेवाळे याने ‘थ्री – इन - वन वाटरपंप’ ही उपकरणे सादर केली होती. त्यात रिद्धी भामरे हिच्या उपकरणाची राज्यस्तरावर प्रथम क्रमांकासाठी निवड झाली. आज समारोपाच्या परितोषिक वितरण समारंभात कुलगुरू देवानंद शिंदे यांच्या हस्ते रिद्धिला प्रथम पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 

तिच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष विश्वास चंद्रात्रे, उपाध्यक्ष अॅड. नितिन चंद्रात्रे, सचिव अनिल राका आदींसह सर्व संचालकांनी अभिनंदन केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक एस. जी. निकम, उपमुख्याध्यापिका जयश्री गुंजाळ, विज्ञान शिक्षक आर. के. मन्सूरी, हेमंत सूर्यवंशी, वृशाली कहाडणे, संध्या धोत्रे, वडील विज्ञान अध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष रमाकांत भामरे, आई कुमिदिनी भामरे, सचिन शेवाळे आदींचे मार्गदर्शन लाभले.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Riddhi Equipment Selected for the display of National Inspiration Award science exibition