सामाजिक बांधिलकी जपत स्वखर्चाने रस्त्याचे काम

दीपक खैरनार
गुरुवार, 29 मार्च 2018

अंबासन (नाशिक) : येथील गावापासून ते वाटोळी नाल्यापर्यंतचा रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी अनेक वर्षांपासून नागरीक करत होते परंतू या भागातील प्रतिनिधीत्व करणाऱ्या नेत्यांनी व जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने वाहनधारकांचे ना ग्रामस्थांचे दु:ख कधी ओळखले. या रस्त्यावर चालणेसुध्दा जिकरीचे, अखेर हे दु:ख नामपुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष अविनाश सावंत व जिल्हा परिषद सदस्य कन्हू गायकवाड यांनी जाणले आणि सामाजिक बांधिलकी जपत स्वखर्चाने रस्ता तात्पुरत्या स्वरूपात डागडूजी केला आहे.

अंबासन (नाशिक) : येथील गावापासून ते वाटोळी नाल्यापर्यंतचा रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी अनेक वर्षांपासून नागरीक करत होते परंतू या भागातील प्रतिनिधीत्व करणाऱ्या नेत्यांनी व जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने वाहनधारकांचे ना ग्रामस्थांचे दु:ख कधी ओळखले. या रस्त्यावर चालणेसुध्दा जिकरीचे, अखेर हे दु:ख नामपुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष अविनाश सावंत व जिल्हा परिषद सदस्य कन्हू गायकवाड यांनी जाणले आणि सामाजिक बांधिलकी जपत स्वखर्चाने रस्ता तात्पुरत्या स्वरूपात डागडूजी केला आहे. एका महिन्यात या दीड किलोमीटर रस्त्यावर डांबरीकरण करून कायमस्वरूपी रस्त्याचे काम करू अशी ग्वाही जिल्हा परिषद सदस्य गायकवाड यांनी दिली.

परिसरातील नागरिकांना वळवाडे गावाला जोडणाऱ्या वाटोळी नाला ते अंबासन गांव या दरम्यानचा दीड किमी रस्ता पूर्णत: उखडला गेला आहे व रस्त्याच्या कडेला काटेरी झाडे झुडपे वाढल्याने हा रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला होता. अनेक वर्षांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी होत होती परंतू संबंधित विभागाने कामाला निधीची अडचण सांगितली जात होती. त्यामुळे हा रस्ता अनेक वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतिक्षेत होता. जिल्हा परिषद सदस्य कन्हू गायकवाड व नामपुर कृृृृ उत्पन्न बाजार समितीचे प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष अविनाश सावंत यांनी या रस्त्याची दयनीय अवस्था बघून तात्पुरत्या स्वरूपात रस्त्याची दुरुस्ती करुन साईड पट्ट्या भरुन, रस्त्याच्या कडेला वाढलेली झाडे झुडपे स्वखर्चाने काढल्याने शेतकरी व वाहनधारकांतुन समाधान व्यक्त केले जात आहे. 

निवडणूकी दरम्यानच्या काळात हा रस्ता दुरुस्त करून देण्याचे अनेक बोलघेवड्या नेत्यांनी आश्वासने दिली होती परंतू निवडणुक काळात सवंग लोकप्रियता मिळवण्यापूरतीच आश्वासने होती का? असा प्रश्न ग्रामस्थांमधून व्यक्त केला जात आहे. येत्या एक ते दीड महीन्यात जिल्हा नियोजन मंडळातर्गंत रस्त्यावर डांबरीकरण करून कायमस्वरूपी रस्त्याचे काम करण्याची ग्वाही जिल्हा परिषद सदस्य श्री. गायकवाड यांनी उपस्थित ग्रामस्थांना दिली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य रविंद्र कोर, सुनील कोर, शशिकांत कोर, सलीम शेख, हेमंत कोर, बबलू आहिरे, भास्कर भामरे, डोंगर कोर, पंढरीनाथ आहिरे आदि उपस्थित होते.

राज्य सरकारने गावाचा विकास करण्यासाठी अनेक योजना अंमलात आणल्या. त्याचा फायदा होतांना दिसत आहे. पण या गावांना जोडणारा रस्ताच जर खराब असेल तर त्याचा फटका अशा गावांना बसणार आहे. गेल्या काही दिवसांत खड्डे विथ सेल्फी हा विषय काही राजकीय नेत्यांनी गाजवला. मात्र, तो फक्त सार्वजनिक बांधकाम विभागापुरता मर्यादित होता. त्यात ग्रामीण भागातील रस्ते दुर्लक्षितच राहिले. काही कामांना आता वेग येत असल्याचे बोलले जात असले तरी तो स्पीड पुढील काळात वाढवणे गरजेचे आहे. 

Web Title: Road work on the self-preservation of the social commitment