मुक्ताईनगर-‘‘अत्याचाराचा प्रतिबंध करण्यासाठी महिलांना एक खून करण्याची परवानगी द्या,’’ अशी गंभीर मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी राष्ट्रपतींकडे पत्राद्वारे केली आहे. सध्या राज्यात मुली, महिलांवर अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. कायदे सक्षम असूनही या घटनांना आळा बसत नसल्याच्या उद्वेगातून ही मागणी त्यांनी केली. ती सुसंगत व कायद्यालाधरून नसली तरी यातून या घटनांच्या गांभीर्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न खडसे यांनी केला आहे.