esakal | "नावा'च्या अध्यक्षपदी सचिन गिते 
sakal

बोलून बातमी शोधा

Live Photo

"नावा'च्या अध्यक्षपदी सचिन गिते 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक ः येथील जाहिरात संस्थांच्या नाशिक ऍडव्हर्टायझिंग एजन्सीज वेल्फेअर असोसिएशनच्या (नावा) अध्यक्षपदी श्री ऍडव्हर्टायझिंगचे संचालक सचिन गिते-पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच सरचिटणीसपदी वत्सदा ऍडव्हर्टायझिंगचे संचालक दिलीप निकम यांची फेरनिवड करण्यात आली. 
संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा हॉटेल राजभोजमध्ये झाली. त्यामध्ये नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ऍड्‌ भाऊसाहेब गंभिरे यांनी काम पाहिले. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मोतीराम पिंगळे व अमोल कुलकर्णी यांनी त्यांना साह्य केले. उपाध्यक्षपदी श्रीशुभ ऍडस्‌चे महेश कलंत्री यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली. श्री. गिते यांनी नवीन कार्यकारिणी जाहीर केली. प्रताप पवार, अभिजित चांदे, नितीन राका यांनी जाहिरात व्यवसायातील बदलाबाबत उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी विठ्ठल देशपांडे, संदीप भालेराव, किरण पाटील, अनिल अग्निहोत्री, कैलाश खैरे आदी उपस्थित होते. 

पदाधिकाऱ्यांची नावे 
खजिनदार ः मिलींद कोल्हे-पाटील, चिटणीस ः प्रवीण मोरे, कार्याध्यक्ष ः राजेश शेळके 
कार्यकारिणी सदस्य ः विठ्ठल राजोळे, नितीन राका, रवी पवार, श्‍याम पवार, गणेश नाफडे, दीपक जगताप, सुहास मुंदडा, नितीन शेवाळे, दत्तात्रय वाळूंज 
 

loading image
go to top