esakal | भगर उत्पादकांनी घेतली उपनिबंधकांची भेट 
sakal

बोलून बातमी शोधा

live photo

भगर उत्पादकांनी घेतली उपनिबंधकांची भेट 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : बाजार समितीकडून बेकायदेशीररित्या वरईवर मार्केट शुल्क आकारल्या जात असल्याच्या विरोधात भगर उत्पादकांनी आज (ता.3) सहकार उपनिबंधकांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेतून उपनिबंधकांनी भगर उत्पादकांना दिला आहे. दरम्यान, त्यानंतर भगर उत्पादकांनी बाजार समितीमध्येही संचालकांची भेट घेत सदरचा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला. 

बाजार समितीकडून राज्य-परराज्यातून नाशिकमध्ये दाखल होणाऱ्या कृषी उत्पन्नावर मार्केट शुल्क आकारते. मात्र वरई हे थेट भगर उत्पादकांच्या मिलमध्ये जाते. असे असले तरी यापूर्वी बाजार समितीकडून वरईच्या वाहनावर 30 रुपये शुल्क आकारले जात होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून राज्य-परराज्यातून वरई घेऊन येणाऱ्या वाहनातील वरईवर एक टक्का मार्केट शुल्क आकारले जाऊ लागले. त्याविरोधात भगर उत्पादकांनी नाराजी व्यक्त करीत, बाजार समितीविरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. 
यासंदर्भात भगर मिल असोसिएशनचे राज्य अध्यक्ष महेंद्र छोरिया यांच्या नेतृत्वाखाली भगर उत्पादकांनी आज (ता.3) सहकार उपनिबंधक गौतम बलसाने यांची भेट घेत त्यांच्यासमोर सदरचा प्रकार कथन केला. उपनिबंधकांनी यासंदर्भात सविस्तर चर्चा करीत, याबाबत सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतर भगर उत्पादकांनी बाजार समितीचे संचालक जगदीश अपसुंदे यांची भेट घेतली. यावेळी भगर उत्पादक अशोक साखला, अखिल राठी, योगेश साखला, अनित नागसेठीया, उमेश वैश्‍य, पियुष बोरा, संदीप जैन, संतोष भंडारी, प्रशांत भटेवरा, दर्शन पिचा आदी उपस्थित होते. 

loading image
go to top