esakal | रिक्षा चोरून एकाची केली लुटमार 
sakal

बोलून बातमी शोधा

Residential photo

रिक्षा चोरून एकाची केली लुटमार 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक: तुलसी आय हॉस्पिटलजवळ रिक्षातून आलेल्या तिघा संशयितांनी एका प्रवाशाची लुटमार केल्याची घटना घडली. संशयितांनी वापरलेली रिक्षा चोरीची असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. 

शाम रामचंद्र उमप (रा. श्रमिकनगर, कॅनॉलरोड, जेलरोड) यांच्या फिर्यादीनुसार, ते गेल्या रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास महामार्ग बसस्थानक येथे उतरले. मुबई नाका सर्कल येथे रिक्षाची वाट पाहत थांबलेले असताना, रिक्षा (एमएच 15 झेड 7293) त्याठिकाणी आली. रिक्षात चालकासह दोघे होते. उमप यांनी द्वारकामार्गे जेलरोड जायचे असल्याचे सांगितले. संशयितांनी त्यांना रिक्षात बसविले आणि तुलसी आय हॉस्पिटलजवळील पुलावर नेऊन त्यांना चाकूचा धाक दाखविला. संशयितांनी त्यांच्याकडून 2 हजार 500 रुपये, मोबाईल चार्जर, पेनड्राईव्ह असा मुद्देमाल बळजबरीने हिसकावून पोबारा केला. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
दरम्यान, पोलिसांनी रिक्षाच्या क्रमांकावरून तपास सुरू केला असता, रिक्षाचालक आझाद शेख याची ती रिक्षा असल्याचे समोर आले. मात्र अज्ञात चोरट्यानी त्याच रात्री त्याची रिक्षा चोरी केल्याचे निष्पन्न झाले. आझाद मेहबुब शेख (रा. रजा बेकरीमागे, भारतनगर) यांची 50 हजार रुपये किमतीची प्रवासी रिक्षा (एमएच 15 झेड 7293) मुन्ना किराणा दुकानासमोर पार्क केलेली असतानाअज्ञात चोरट्याने गेल्या शनिवारी (ता.31) चोरून नेली. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
दुचाकीची चोरी 
भास्कर चौतुराम पाखरे (रा. महालक्ष्मीधाम सोसायटी, वैशालीनगर, दसक, जेलरोड) यांची 20 हजार रुपये किमतीची स्प्लेंडर दुचाकी (एमएच 15 इसी 4371) गेल्या 18 ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या सुमारास राहत्या घराच्या पार्िकंगमधून चोरीला गेली. याप्रकरणी उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 

loading image
go to top