esakal | गणेशवाडीत दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद 
sakal

बोलून बातमी शोधा

Residential photo

गणेशवाडीत दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पंचवटीतील गणेशवाडी भाजी बाजार येथे संशयास्पदरित्या रिक्षा पंचवटीच्या गस्ती पथकाच्या निदर्शनास आली आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला जेरबंद करता आले. रिक्षातील संशयितांकडून दरोड्याचे साहित्य असा दीड लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (ता.1) रात्री पावणेनऊ वाजेच्या सुमारास पंचवटी पोलीसांचे रात्रपाळीचे उपनिरीक्षक योगेश उबाळे यांच्यासह गस्तपथक गणेशवाडीतील भाजी बाजार परिसरातून जात होते. त्यावेळी गस्तीपथकाला रिक्षा (एमएच 15 एके 6432) अंधारात उभी असलेली दिसली. रिक्षात पाच संशयितQ होते. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांना त्यांचा संशय आला. उपनिरीक्षक उबाळे यांनी रिक्षाची झडती घेतली असता, त्यामध्ये लोखंडी तलवार, चॉपर, नायलॉन दोरी, दहा हजार रुपयांचे दोन मोबाईल, तसेच, दरोड्यासाठी वापरण्यात येणारी मिरचीपूड असे दरोड्याच्या पूर्वतयारीचे साहित्य मिळून आले. रिक्षासह साहित्य असा 1 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. 
पोलिसांनी संशयित याकूब गुलाब मदारी (22), जाकीर बशीर शहा (22), मोसीन ऊर्फ शेरू कालू खान (सर्व रा. म्हाडा बिल्डिंग, वडाळागाव), हबिब हनिफ शहा (19, रा. मेहबुबनगर, वडाळागाव), जावेद पिरन शहा (21, रा. पाथर्डीगाव, राजवाडा) या पाच संशयितांना अटक केली. याप्रकरणी पंचवटी पोलिसात जमावबंदी व शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन, तसेच दरोडयाच्या तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक योगेश उबाळे अधिक तपास करीत आहेत. सदरची कामगिरी उपनिरीक्षक उबाळे यांच्यासह हवालदार बस्ते, गायकवाड, चारोस्कर यांनी बजावली. 

loading image
go to top