esakal | आयटीआय सिग्नलवर दोघांना मारहाण करून लुटले 
sakal

बोलून बातमी शोधा

Residential photo

आयटीआय सिग्नलवर दोघांना मारहाण करून लुटले 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक, ता. 4 : मध्यरात्रीच्या सुमारास हॉटेलमध्ये जेवणासाठी आलेल्या दोघांना आयटीआय सिग्नलवर कारमधून आलेल्या चौघांनी मारहाण करून त्यांच्याकडील रोकड आणि त्यांची दुचाकी हिसकावून पोबारा केल्याची घटना घडली. सातपूर पोलीस ठाण्यापासून काही अंतरावरच सदरची घटना घडलेली असताना, पोलिसांना मात्र त्यांचा मागमूसही लागला नाही. 

जितेन सोमेन जयदेवन (रा. अर्पिता रोहाऊस, अंबिकानगर, द्वारका, नाशिक. मूळ रा. द्वारका हाऊस, कृष्णपुरम, आलपुरा, केरळ) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या मंगळवारी (ता.3) मध्यरात्री अडीच वाजेच्यासुमारास त्यांचा भाऊ शरद राशीकुमार यांच्यासमवेत सातपूर औद्योगिक वसाहतीतील कुमार बार या हॉटेलमध्ये जेवणासाठी आले होते. मात्र हॉटेल बंद झाल्याने ते परत आपल्या दुचाकीवरून आयटीआय सिग्नलकडून जात होते. त्यावेळी स्विप्ट कारमधून आलेल्या चौघांनी त्यांची दुचाकी अडविली. दोघांना बळजबरीने कारमध्ये बसविले. दोघांना कारमध्ये बेदम मारहाण केल्यानंतर दोघांकडील रोकड बळजबरीने हिसकावली. जितेन यांचा चष्माही हिसकावला. तसेच त्यांच्याकडील दुचाकी बळजबरीने हिसकावून पोबारा केला. सातपूर पोलीस ठाण्यापासून अवघ्या काही अंतरावर सदरची घटना घडली आहे. याप्रकरणी सातपूर पोलिसात अपहरण, लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

loading image
go to top