esakal | कामगारनगर येथे महिलेच्या श्रीमुखात मारून पोत ओरबाडली 
sakal

बोलून बातमी शोधा

Residential photo

कामगारनगर येथे महिलेच्या श्रीमुखात मारून पोत ओरबाडली 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातपूर, वासननगरमध्ये घटना : पोलिसांना लागेना थांगपत्ता 

नाशिक : सातपूरच्या कामगार नगरमध्ये पूजेसाठी फुले वेचत असणाऱ्या 75 वर्षीय वयोवृद्ध महिलेच्या श्रीमुखात मारून सोनसाखळी चोरट्यांनी 50 हजार रुपयांचे मंगळसूत्र ओरबाडून नेले. तर दुसऱ्या घटनेत वासननगर येथे पादचारी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी ओरबाडून नेली. या प्रकरणी संबंधित पोलीसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, सोनसाखळी चोरट्यांचा कोणताही मागमूस पोलिसांना लागू शकलेला नाही. ऐनसणासुदीच्या काळात सोनसाखळ्या ओरबाडण्याच्या घटनांनी पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे. 

ओंकार आहिरराव (75, रा. शिवलोक अपार्टंमेंट, गंगासागरनगर, वनविहार कॉलनी, कामगारनगर, सातपूर) यांच्या फिर्यादीनुसार, कामगार नगरमध्ये सोमवारी (ता.2) सकाळी सहा-साडेसहा वाजेच्या सुमारास त्या राहत्या इमारतीसमोर झाडांखाली फुले वेचत होता. त्यावेळी दुचाकीवरून दोघे संशयित त्यांच्याजवळ आले. दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या संशयिताने वयोवृद्ध मीरा यांच्या श्रीमुखात दोन चापटी मारल्या आणि त्यांच्या गळ्यातील 50 हजार रुपये किमतीचे दोन तोळ्यांची सोन्याची पोत पॅन्डलसह बळजबरीने ओढून पोबारा केला. अवघ्या काही क्षणात घडलेल्या घटनेने वयोवृद्ध महिला भांबावल्या होत्या. याप्रकरणी सातपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक रघु नरोटे हे तपास करीत आहेत. 
दुसरी घटना सातपूर परिसराती घडली. वासननगर येथील भाजीपाला घेऊन पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने ओढून नेली. उज्ज्वला भास्कर नवाळे (रा. जयगणेश रो-हाऊस, वासननगर, इंदिरानगर) यांच्या फिर्यादीनुसार, सोमवारी (ता.2) रात्री साडेसात वाजेच्या सुमारास त्या भाजीपाला घेऊन घराकडे पायीच जात होत्या. पाणीनी सोसायटीसमोर आल्या असतानाच, समोरून आलेल्या दुचाकीवरून दोघा संशिंयतांनी त्यांच्या गळ्यातील 30 हजार रुपयांची दीड तोळ्याची सोन्याची पोत ओढून नेली. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 

loading image
go to top