महंत सुधीरदास पुजारी यांची दुबई न्यायालयाकडून निर्दोष सुटका 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

नाशिक : फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याप्रकरणी गेल्या आठ महिन्यांपासून दुबईमध्ये अडकून पडलेले महंत सुधीरदास महाराज पुजारी यांची ेदुबई न्यायालयाने निर्दोष सुटका केली आहे. दुबईच्या रॉयल फॅमिलीशी संबंधित व्यक्तीची 50 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा खोटा खटला त्यांच्यावर दाखल करण्यात आला होता. परंतु पोलीस तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेत त्यांचे निर्दोषत्व सिद्ध झाले. तसेच, त्यांना भारतीय परराष्ट्र मंत्रालयासह केंद्रशासनाकडूनही मदत मिळाल्याचे महंत सुधीरदास पुजारी यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. 

नाशिक : फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याप्रकरणी गेल्या आठ महिन्यांपासून दुबईमध्ये अडकून पडलेले महंत सुधीरदास महाराज पुजारी यांची ेदुबई न्यायालयाने निर्दोष सुटका केली आहे. दुबईच्या रॉयल फॅमिलीशी संबंधित व्यक्तीची 50 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा खोटा खटला त्यांच्यावर दाखल करण्यात आला होता. परंतु पोलीस तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेत त्यांचे निर्दोषत्व सिद्ध झाले. तसेच, त्यांना भारतीय परराष्ट्र मंत्रालयासह केंद्रशासनाकडूनही मदत मिळाल्याचे महंत सुधीरदास पुजारी यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. 

गेल्या 23 जानेवारी 2019 रोजी महंत सुधीरदास पुजारी यांना दुबई विमानतळावर अटक करण्यात आली होती. त्यांचा पासपोर्ट दुबई पोलिसांनी जप्त केला होता. तसेच न्यायालयीन प्रक्रिया पार पडेपर्यंत त्यांना दुबई सोडण्यास मनाई करण्यात आलेली होती. गेल्या आठवड्यात दुबई न्यायालयाने त्यांची निर्दोष सुटका केल्यानंतर ते गेल्या सोमवारी (ता.9) दुबईतून नाशिकमध्ये दाखल झाले. 
महंत पुजारी यांनी सांगितले की, दुबईमध्ये बालाजी मंदिर उभारण्यासाठी 22 एकर जागा मिळणार होती. पुजारी यांच्या सराह इन्व्हेस्टमेंट कंपनीमार्फत त्यांनी मंदिरासंदर्भात देणगीसाठी बॅंकेत खाते उघडले होते. दुबईच्या रॉयल फॅमिलीशी संबंधित व दुबई इकॉनॉमिक्‍स फोरमचे संचालक अब्दुल वलिद यांनी पुजारी यांच्याकडे प्रायोजकत्वासाठी 50 लाख रुपयांची मागणी केली होती. बॅंकेत खाते उघडले परंतु, त्यांना चेकबुक वा अन्य सेवासुविधा पुरविण्यात आल्या नव्हत्या. याबाबत पुजारी यांना संशय आल्याने त्यांनी ते खाते बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी संचालक वलिद यांनी पुजारी यांच्या अरबी भाषेतील कागदांवर स्वाक्षऱ्या घेतल्या. त्या अरबी पत्रांमध्ये 50 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा ÷उल्लेख होता. 
त्यानंतर ते 23 जानेवारी रोजी दुबई विमानतळावर भारतात येण्यासाठी आले असता, त्यांना बुर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा असल्याने अटक करण्यात आली. पोलिसांनी पासपोर्ट जप्त केला. पोलीस तपास, न्यायालयीन कामकाज संपेपर्यंत दुबईतून बाहेर जाण्यास मनाई केली. दरम्यान, पोलीस तपासानंतर न्यायालयीन प्रक्रियेत त्यांची दिशाभूल करीत कागदांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्याचे सिद्ध झाल्याने त्यांची निर्दोष सुटका केल्याचे श्री.पुजारी यांनी सांगितले. 

दुबईतील घडलेल्या घटनेप्रकरणी श्री. पुजारी यांनी तत्कालिन खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण, हेमंत गोडसे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी भारतीय परराष्ट्र मंत्रालय, तत्कालिन परराष्ट्रमंत्री स्व. सुषमा स्वराज यांना माहिती दिली. पुजारी यांनीही केंद्र शासन व परराष्ट्र मंत्रालयाकडे पत्रव्यवहार केल्याने त्यांनीही दुबई प्रशासनाकडे याबाबतचा पाठपुरावा केला. विद्यमान परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनीही पाठपुरावा केल्याचे श्री. पुजारी यांनी सांगितले. मात्र नॅशनल हेरॉल्ड या इंग्रजी दैनिकातून चुकीच्या आशयाच्या बातम्या आल्याने, त्याचा चौकशीदरम्यान त्रास झाल्याचेही ते म्हणाले. 

सोशल मीडियावरील छायाचित्रे पाहूनही झाली चौकशी 
श्री.पुजारी यांच्या फेसबुक अकांऊटवर काळाराम मंदिर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघाचे प्रमुख मोहन भागवत यांचे छायाचित्र आहेत. त्यावरून दुबई पोलिसांनी चौकशी केली. चौकशीतून हिंदू धर्माचे महंत असल्याचे समोर आल्यानंतर आदराने वागणूक दिल्याचेही श्री. पुजारी यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashiksudirdascrimenews