"यशोधरा'च्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल 

नरेश हाळणोर
रविवार, 8 सप्टेंबर 2019

"सकाळ'मधून "यशोधराचे गौडबंगाल' मालिका प्रसिद्ध : पोलिसांकडून टाळाटाळ; न्यायालयाने दिला आदेश

"सकाळ'मधून "यशोधराचे गौडबंगाल' मालिका प्रसिद्ध : पोलिसांकडून टाळाटाळ; न्यायालयाने दिला आदेश

नाशिक : शासकीय, निमशासकीय आणि देवस्थानांच्या प्रसादाचा ठेका घेऊन फसवणूक करणाऱ्या, तसेच संस्थेशी कोणताही संबंध नसताना निरक्षर महिलेची बनावट कागदपत्रांच्या आधारे संचालक म्हणून नेमणूक करणाऱ्या ÷"यशोधरा महिला सहकारी औद्योगिक उत्पादक संस्था मर्यादित या संस्थेच्या संचालकांसह 36 जणांविरोधात नाशिकरोड पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. गेल्या काही महिन्यांपासून पोलीस सदरचा गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करीत असल्याने, तक्रारदाराने न्यायालयात धाव घेतली होती. अखेर न्यायलयाच्याने आदेशाने नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल झाला. "यशोधराचे गौडबंगाल' या नावाखाली "सकाळ'मधून संस्थेच्या गैरव्यवहाराविषयीची वृत्तमालिका प्रसिद्ध झाली होती. याच संस्थेने राज्यातील अनेक देवस्थान ट्रस्टच्या प्रसादाचा ठेका घेत त्यांची फसवणूक केल्याचे माहितीच्या अधिकारातून समोर आले होते. 
... 
नाशिकरोडच्या चेहडी पंपींग परिसरातील संगमेश्‍वर नगरमध्ये डॉ. कोतकर बंगल्यात दि यशोधरा महिला सहकारी औद्योगिक उत्पादक संस्था मर्यादित या संस्थेचे कार्यालय आहे. तक्रारदार मीराबाई नाना गायकवाड (60, रा. शिवडी, ता. निफाड, जि. नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार, या संस्थेच्या अध्यक्षा व मुख्य संशयित संगीता अनिल दशपुते यांनी 2008 मध्ये फिर्यादींचा मुलगा सोमनाथ गायकवाड हा कामाला असताना, तुझ्या पीएफ, इएसआयसीच्या नोंदीवर वारस नोंदीसाठी तुझ्या आईचे नाव लावायचे असून त्यासाठी मीराबाई यांचे मतदान कार्ड, फोटो असा दस्तऐवज घेतले. त्यावरून बनवाट दस्तऐवज बनवून खोटे रहिवासी दाखले करून संमतीशिवाय संस्थेच्या संचालक दाखवले. त्याचप्रमाणे यशोधरा या संस्थेचे राज्यातील शासकीय, निमशासकीय आणि देवस्थानांच्या प्रसाद बनवून देण्याचे ठेके घेत, शासनाची फसवणूक करून आर्थिक अपहार केला आहे. 
याप्रकरणी सोमनाथ गायकवाड यांनी आई मीराबाई यांच्यातर्फे नाशिकरोड पोलिसात तक्रार दिली. सहकार विभागाकडेही पाठपुरावा केला. परंतु गुन्हा दाखल करण्यास पोलिसांकडून टाळाटाळ केली जात होती. अखेरीस, त्यांनी न्यायालयात धाव घेतली असता, न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर त्यानुसार नाशिकरोड पोलिसात यशोधराच्या 36 संशयितांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 

हे आहेत संशयित 
संगीता अनिल दशपुते (51), गितांजली चंद्रकांत निकम (54), भाग्यश्री अनिल दशपुते (28), कल्पना विकास चिंचोले (48), सरला राजेंद्र कोतकर (54), आरती छगनराव जाधव (45), चैताली महेंद्र सोनवणे (51), मालती सुभाष मोरे (45), जकिरा असिफ काजी (51), सुजाता अजय दशपुते (40), हेमा गोपाळ पाठक (54), शालिनी सागर तायडे (45), छाया उमेश पाठक (45), ललिता ज्ञानेश्‍वर धामणे (55), अनिता नितीन नानकर, सनिता नितीन प्रधान, नलिनी विजय दशपुते, संजीवनी मलिक्कार्जून भुसारे, मंगला विनोद दशपुते, अंजली मिलिंद कटारिया (40), मीना बाळकृष्ण निकम (22), सुनिता प्रताप राठोड, संगीता अजय गाकवाड (45), कमलाबाई वसंत येवला (60), भारती भगवान अमृतकर, प्रज्ञा प्रकाश धर्माधिकारी, वर्षा सुनील दशपुते (50), उषा अशोक जगताप, कविता दिनेश दोंदे, भारती प्रवीण दशपुते, निता दिलीप ब्राह्मणकर (55), स्मिता श्रीराम धामणे(55), वंदना निलेश दशपुते, स्वाती योगेश दशपुते, अनिता किरण वाणी, गोपाळ पाठक. 

"सकाळ'ची "यशोधराचा गौडबंगाल' मालिका 
"सकाळ'मधून गेल्या जानेवारी 2019 मध्ये "यशोधराचा गौडबंगाल'ची मालिका प्रसिद्ध झाली होती. या मालिकेतून संस्थेवर नेमलेल्या संचालिकांच्या बनावट दस्तऐवज, नगरसेवकांकडून मिळविलेले खोटे रहिवासी दाखले यासह, शिर्डी देवस्थानच्या प्रसादाचा ठेकाही या संस्थेचे मिळविला होता. परंतु मजुरांची मजुरी न देता अपहार केला. तर, सप्तशृंगी देवस्थाननेही या संस्थेला काळ्या यादीत समाविष्ठ केले आहे. अशारितीने या संस्थेने राज्यातील अनेक शासकीय-निमशासकीय, रुग्णालयांचे ठेके घेत फसवणूक केल्याचे माहिती अधिकाराच्या माध्यमातून समोर आलेले आहे. याची "यशोधराचा गौडबंगाल' ही वृत्तमालिकाच "सकाळ'ने प्रसिद्ध केली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashikyashodharafroudcrimenews