esakal | जलालपूर गावातील रस्त्याची दैना 
sakal

बोलून बातमी शोधा

live

जलालपूर गावातील रस्त्याची दैना 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा


नाशिक, ता. 3- ऑगष्ट महिन्यात गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे नदी काठ ओलांडून काठच्या गावांमध्ये पाणी गेल्याने या गावातील रस्त्यांची दैना झाली आहे. सोमेश्‍वर धबधब्या पासून काही अंतरावर असलेल्या जलालपुर गाव हे त्यापैकीचं सोमेश्‍वर धबधब्या पासून या गावाकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील खडी वाहून गेल्याने मोठे खड्डे पडले आहे. या गावात जाण्यासाठी हा एकमेव रस्ता आहे. वाहने चालविताना मोठी कसरत करावी लागते, वाहने तर सोडाचं पायी चालणे देखील मुश्‍कील झाल्याने नागरिक मेटाकुटीला आले आहेत. जलालपूर गावांतून शहरात जाण्यासाठी सर्वांत महत्त्वाचा रस्ता असल्याने तातडीने रस्त्याची दुरुस्तीची मागणी ग्रामपंचायतीकडे करण्यात आली आहे. मात्र अद्यापही ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेतल ीजात नाही. अमोल भालेराव, अकाश जाधव, नाना भालेराव, अतुल गांगुर्डे आदींनी रस्ते दुरुस्तीचे निवेदन देण्यात आले. 
 

loading image
go to top