Nashik News : सारंगखेडा यात्रेत 109 घोड्यांची विक्री

Sarangkheda (To. Shahada) : Horses entered in Yatra.
Sarangkheda (To. Shahada) : Horses entered in Yatra.esakal
Updated on

शहादा : रुबाबदार, ऐटदार व जातिवंत अश्वांसाठी देशभर प्रसिद्ध असलेल्या सारंगखेडा येथील अश्व बाजारात अवघ्या दोन दिवसांत लाखोंची उलाढाल झाली. आजच्या ५ जी व ६ जी गाड्यांच्या जमान्यातही अश्वप्रेमींना येथील अश्व बाजार चांगलाच भुरळ घालत आहे.

अध्यात्म व जातिवंत अश्वांच्या पर्वणीचा अनोखा संगम येथील यात्रेत अनुभवायला मिळत आहे. शुक्रवारी (ता. ९) दिवसभरात १०९ घोड्यांची विक्रमी विक्री झाली.

सारंगखेडा (ता. शहादा) एकमुखी श्री दत्त यात्रेला श्री दत्त जयंतीपासून खऱ्या अर्थाने सुरवात झाली. यात्रेत भरणाऱ्या अश्व बाजाराला प्राचीन इतिहास आहे. राजेरजवाड्यांपासून तर हल्लीचे सिनेकलावंत, विदेशी नागरिक, राजकीय नेते, कार्यकर्ते साऱ्यांचीच या बाजारात अश्व पाहणी व खरेदीसाठी हजेरी असते. (Sale of 109 horse in Sarangkheda Yatra Jalgaon News)

हेही वाचा : देशाचे नवे पर्यायी चलन ‘डिजिटल रुपी’

Sarangkheda (To. Shahada) : Horses entered in Yatra.
Jalgaon News : वाळूमाफियांकडून तलाठी, कोतवालास जीवे ठार मारण्याची धमकी

या अश्व बाजारात देशभरातून अश्वप्रेमी दाखल होत असतात. घोडेबाजारात दर वर्षी कोट्यवधींची उलाढाल होते. यंदाचा अश्व बाजारही चांगलाच भरला असून, आतापर्यंत यात्रेत एक हजार ७०० घोडे दाखल झाले आहेत. काठेवाड, मारवाड, सिंध, पंजाब अशा विविध जातींचे घोडे दाखल झालेले आहेत. दररोज घोड्यांची विक्री होत आहे. त्याचबरोबर विविध प्रांतांतून अश्व विक्रेते आपल्या अश्वांना विक्रीसाठी घेऊन येत आहेत.

अध्यात्म व जातिवंत

अश्वांच्या पर्वणीचा संगम

येथील एकमुखी दत्त मंदिर प्राचीन आहे. मंदिरातील एकमुखी दत्ताची मूर्ती नवसाला पावणारी आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे लाखो भाविक दर वर्षी दर्शनासाठी येत असतात. त्याचबरोबर यात्रेत भरणारा अश्व बाजार रुबाबदार घोड्यांमुळे येणाऱ्या प्रत्येकाला भुरळ घालतो. या ठिकाणी अध्यात्म आणि जातिवंत अश्वांच्या पर्वणीच्या अनोखा संगम पाहायला मिळतो. देश-विदेशातील अश्वप्रेमींना येथे भरणारा घोड्यांचा बाजार खुणावत आहे.

शुक्रवारची उलाढाल

-एकूण घोडे आवक १,७००

-घोडेविक्री संख्या १०९

-विक्री किमत २५,७८,००० रुपये

शुक्रवारअखेर एकूण घोडेविक्री संख्या २४९

एकूण विक्री किंमत ६९,५१,५०० रुपये

घोडी जास्तीत जास्त किंमत ३,००,००० रुपये

Sarangkheda (To. Shahada) : Horses entered in Yatra.
Jalgaon News : अमळनेर-चोपडा रेल्वेमार्गाची चाचपणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com