धुळे जिल्ह्यात ‘शाबास गुरुजी’चा बोलबाला

Chief Executive Officer Bhuvneshwar S. Teacher of Khalane Zilla Parishad School while presenting PPT in his hall.
Chief Executive Officer Bhuvneshwar S. Teacher of Khalane Zilla Parishad School while presenting PPT in his hall.esakal

कापडणे (जि. धुळे) : धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वर एस. यांच्या संकल्पनेतून ‘चाय पे चर्चा’अंतर्गत ‘शाबास गुरुजी’ हा उपक्रम त्यांच्या दालनात राबविला जात आहे.

यात जिल्हाभरातून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शाळा व उपक्रमशील शिक्षकांना त्यांच्या कार्याचे व शाळा स्तरावरील राबविलेल्या उपक्रमांचे सादरीकरण करण्याची संधी चौथ्या शनिवारी उपलब्ध करून दिली आहे. त्यांच्यासोबत ‘चाय पे चर्चा’ही होत आहे. (Shabas Guruji in Dhule district Latest Marathi news)

मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वर एस. यांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी ‘शाबास गुरुजी’ हा उपक्रम सुरू केला आहे. थेट त्यांच्या दालनात महिन्याच्या चौथ्या शनिवारी उपक्रमशील शिक्षक आणि उपक्रमशील शाळेला उपक्रम सादरीकरणाची संधी दिली जात आहे. पीपीटीच्या माध्यमातून उपक्रम सादर होत आहेत. यासाठी शाळेतील सर्व शिक्षक सहभागी होत आहेत. प्रत्येक तालुक्यातील उपक्रमशील शाळा निवडीसाठी शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकारी मेहनत घेत आहेत.

Chief Executive Officer Bhuvneshwar S. Teacher of Khalane Zilla Parishad School while presenting PPT in his hall.
नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात महाराष्ट्र अव्वलस्थानी

आठ शाळांना मिळाली संधी

जुलैमधील चौथ्या शनिवारी शिंदखेडा तालुक्यातील खलाणे व वरपाडे, धुळे तालुक्यातील निमडाळे व वरखेडे, साक्री तालुक्यातील खुडाणे व सालटेक आणि शिरपूर तालुक्यातील उमर्दा व अंजदे या शाळांना उपक्रम सादरीकरणाची संधी मिळाली.

या वेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी मोहन देसले, शिक्षण विस्ताराधिकारी मनीषा वानखेडे, सिद्धार्थ नगराळे आदी उपस्थित होते.

दरम्यान, खलाणे शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत डिगराळे, राकेश पाटील, जयश्री गिते, राजेंद्र पाटील, अतुल खोडके, विद्या जाधव, ज्ञानेश्वर तवर, कैलास वाघ, शीतल चव्हाण यांनी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांचे सादरीकरण केले.

"शिक्षकांनी केलेल्या कार्याची दखल घेतली जात आहे. ही बाब खूपच प्रेरणादायी आहे. या उपक्रमामुळे उपक्रमशील शिक्षक व शाळा जिल्ह्यातील आरसा ठरणार आहेत. शिक्षकांना ‘चाय पे चर्चा’मुळे मानाचे स्थानही मिळत आहे." -राकेश पाटील, शिक्षक, जि. प. शाळा, खलाणे

Chief Executive Officer Bhuvneshwar S. Teacher of Khalane Zilla Parishad School while presenting PPT in his hall.
Civil Hospital : वाहने करा पार्क अन् खुशाल जा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com