Nashik-Pune Highway

Nashik-Pune Highway

sakal 

Nashik-Pune Highway : टोल भरूनही रांगेत उभे राहा! नाशिक-पुणे महामार्ग पुन्हा ठप्प, प्रवाशांचा संताप शिगेला

Massive Traffic Jam on Pune-Nashik Highway at Sangamner : संगमनेरजवळील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामामुळे लागलेली १० ते १२ किलोमीटर लांबीची वाहतूक कोंडी. टोल भरूनही तासन्तास अडकल्यामुळे वाहनचालकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण होते.
Published on

संगमनेर: संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी (ता. ५) सकाळपासून अक्षरशः गोंधळ माजला. माहुली- घारगाव-बोटा या पट्ट्यात सकाळी सुरू झालेली वाहतूक कोंडी दुपारपर्यंत सुटलेली नव्हती. दहा ते बारा किलोमीटरच्या संपूर्ण मार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या होत्या. काही प्रवासी वाहनातून उतरून असह्य नजरेने रांगेचा शेवट कुठे आहे, हे पाहण्याचा प्रयत्न करत होते. टोल भरूनही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याने वाहनचालकांनी अक्षरशः संताप व्यक्त केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com