सारंगखेडा चेतक महोत्सवाचा करार रद्द

सकाळ वृत्तसेवा
Monday, 2 December 2019

नंदुरबार : सारंगखेडा येथील एक मुखी दत्ताच्या यात्रेत गेल्या दोन वर्षापासून सुरू झालेल्या चेतक महोत्सवाबाबत पर्यटन विकास महामंडळाने अहमदाबादच्या लल्लूजी ॲड संन्स यांच्याशी केलेला करार आर्थिक अनियमिततेमुळे व राज्य शासनाची परवानगी घेतलेली नसल्याने रद्द करण्यात येत असल्याचे पर्यटन विकास मंत्रालयाने म्हटले आहे. याबाबतचे आदेश मंत्रालयाच्या कक्ष अधिकाऱ्यांनी राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना काढले आहेत. 

आदेशात म्हटले आहे की सारंगखेडा येथील चेतक महोत्सव २०१८-१९ साठी निधी उपलब्ध करण्याबाबत आपण पाठवलेल्या पत्रानुसार महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने केलेल्या करारानुसार निधी उपलब्ध करण्याचा प्रस्ताव नियोजन व वित्त विभागात मान्यतेसाठी पाठवला असता संबंधित विभागाने मेसर्स लल्लूजी अँड सन्स यांच्यासोबत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने केलेल्या करारास तसेच त्यासाठी प्रसिद्ध केलेल्या स्वारस्य अभिव्यक्ती मसुद्यास शासनाची मान्यता घेतलेली नसल्याने तसेच सदर करार हा केंद्र शासनाच्या धोरणानुसार नसल्याने व त्यामुळे वित्तीय अनियमितता झाली असल्याकारणाने अमान्य केला आहे. कंपनीसोबत झालेला करार रद्द करण्याशिवाय पर्याय नाही, असे अभिप्राय दिले आहेत. नियोजन व वित्त विभागाच्या सदर अभिप्रायासह अनुसरून सारंगखेडा येथील चेतक महोत्सव बाबत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने मेसर्स लल्लूजी अँड सन्स यांच्यासोबत केलेला करार तसेच त्या अनुषंगाने देण्यात आलेले कार्यादेश तत्काळ रद्द करण्यात यावेत, असे कक्ष अधिकारी(पर्यटन ) सु.नि. लांबाते यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे. 

आर्थिक अनियमितता हे कारण 
पर्यटन विकास महामंडळाने सुरु केलेल्या चेतक महोत्सवाचा मसुदा व प्रकल्प आराखडा तयार न करता तसेच करार करताना राज्य शासनाची परवानगी घेतली नसल्याचे पर्यटन विभागाने म्हटले आहे. या प्रकाराला महामंडळाच्या अंतर्गत लेखा परीक्षकाने ही आक्षेप घेतल्याचे सांगितले जाते. राज्याचे मुख्य सचिव अजय मेहता यांनी सदर करार रद्द करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले होते, त्यानुसार २८ नोव्हेंबरला पर्यटन विभागाने महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना याबाबतचे पत्र पाठविले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sarangkheda chetak mahotsav agriment cancal