Sarangkheda News : सारंगखेडा अश्‍व बाजारात घोड्यांच्या खरेदी-विक्रीला प्रारंभ; दौंडचे आमदार राहुल कुल यांनी ११ लाखांच्या घोडीची केली 'बोहनी'

Sarangkheda Horse Market Begins with High-Value Deals : सारंगखेडा येथील प्रसिद्ध अश्‍व बाजारात दौंडचे आमदार राहुल कुल यांनी भरतपूर येथील कृष्णवीरसिंग राजपूत यांच्याकडून २० महिने वयाची 'नुकरा' जातीची घोडी ११ लाख ११ हजार रुपयांना खरेदी केली. या खरेदीने अश्‍व बाजारातील उलाढालीला सुरुवात झाली.
Horse Market

Horse Market

sakal

Updated on

शहादा: जातिवंत व उमद्या घोड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या सारंगखेडा (ता. शहादा) येथील अश्‍व बाजार विविध प्रांतातील घोड्यांच्या आगमनाने बहरला आहे. ११ लाखांच्या घोडे खरेदीतून अश्‍व बाजारात घोडे खरेदी- विक्रीला बुधवारी (ता. ३) प्रारंभ झाला. दौंडचे आमदार राहुल कुल यांनी येथील अश्‍व बाजारातून घोड्यांची खरेदी केली. चेतक फेस्टिवलचे अध्यक्ष जयपालसिंह रावल यांनी त्यांचे पुत्र आदित्य कुल यांचे स्वागत केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com