Rani Dilkubarba Rawal
sakal
धुळे: सारंगखेडा (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील ऐतिहासिक रावल संस्थानच्या राजमाता राणीसाहेब दिलकुवरबा छत्रसिंहजी रावल (वय ९५) यांचे मंगळवारी (ता. २७) दुपारी दोनच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने रावल संस्थानसह सारंगखेडा परिसरात शोककळा पसरली. राजमाता दिलहरकुवरबा रावल यांची अंत्ययात्रा बुधवारी (ता. २८) सकाळी दहाला सारंगखेडा येथील निवासस्थानापासून निघणार आहे.