esakal | धुळे तालुक्यात सरपंचांची उद्यापासून निवडणूक 
sakal

बोलून बातमी शोधा

धुळे तालुक्यात सरपंचांची उद्यापासून निवडणूक 

सरपंच आरक्षण यापूर्वीच झाले आहे. सरपंचपदासाठी चुरस असल्याने बहुतांश गावांमध्ये सदस्यांची पळवापळवी झाली आहे.

धुळे तालुक्यात सरपंचांची उद्यापासून निवडणूक 

sakal_logo
By
एल. बी. चौधरी

सोनगीर : धुळे तालुक्यातील निवडणूक झालेल्या सर्व ७२ ग्रामपंचायतींचे सरपंच व उपसरपंच निवडणूक जाहीर झाले असून, ११ ते १६ फेब्रुवारीदरम्यान चार दिवस निवडणुकीचा कार्यक्रम होणार आहे. निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नेमणूक झाली. 

आवश्य वाचा- गौण खनिजाची रॉयल्टी चुकविणे सरपंचासह सात जणांना पडले महागात 
 

तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूक किरकोळ घटना वगळता शांततेत झाली. सरपंच आरक्षण यापूर्वीच झाले आहे. सरपंचपदासाठी चुरस असल्याने बहुतांश गावांमध्ये सदस्यांची पळवापळवी झाली आहे. तालुक्यात ७२ गावांतील २५६ प्रभागांत ६९४ सदस्य निवडून आले. ३६ गावांत महिलाराज आहे. येत्या ११, १२, १५ फेब्रुवारीला प्रत्येकी २० ग्रामपंचायत, तर १२ ग्रामपंचायतींत सरपंच निवडणूक १६ फेब्रुवारीला होईल. सरपंच व उपसरपंच निवडणूक जाहीर तारखा व ग्रामपंचायत.

आवर्जून वाचा- शिक्षक पती-पत्‍नीचे निवृत्तीनंतर धाडस; पासष्टीच्या वयात त्यांनी ‘कळसूबाई’चे शिखर केले सर 
 

निवडणूक जाहीर

पुढीलप्रमाणे : ११ फेब्रुवारी : सरवड, मोराणे प्र. नेर, चिंचवार, अजंग कासविहीर, अजनाळे, अंचाळे, आमदड, वजीरखेडे, आंबोडे, विसरणे, उडाणे, कापडणे, कावठी, कुंडाणे, वेल्हाणे, खेडे सुट्रेपाडा, तांडा कुंडाणे, निमखेडी, खंडलाय खुर्द, खंडलाय बुद्रुक, बांबुर्ले प्र. नेर, गरताड. १२ फेब्रुवारी : गोंदूर, चिंचखेडे, चौगाव हिंगणे, जुनवणे, तरवाडे, मोरदड तांडा, दह्याणे, दापुरा-दापुरी, दोंदवाड, देऊर खुर्द, धामणगाव, नरव्हाळ, नवलाणे, निमडाळे, निकुंभे, नांद्रे, पाडळदे, पिंपरखेडे, पुरमेपाडा, बल्हाणे. १५ फेब्रुवारी : बाबरे, बिलाडी, बोरसुले, बेंद्रेपाडा, बोरीस, बोदगाव, वणी खुर्द, बोरविहीर, भिरडाणे, भिरडाई, मोरदड, मोहाडी प्र. डांगरी, मोरशेवडी, मोघण, रामी, लळिंग दिवाणमळा, लोहगड, लोणखेडी, वडजाई, वणी बुद्रुक, वडगाव, विंचूर. १६ फेब्रुवारी : वेल्हाणे बुद्रुक, शिरूड, शिरधाने प्र नेर, सडगाव हेंकळवाडी, सावळदे, सावळी तांडा, सायने, सांजोरी, सोनगीर, नेर, सोनेवाडी, खोरदड. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे