शिरपूर तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतीवर भाजपचा दावा 

सचिन पाटील 
Friday, 12 February 2021

११ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदी तर आठ ग्रामपंचायतींवर उपसरपंचपदी महिला विराजमान झाल्या. 

शिरपूर : जानेवारीमध्ये निवडणूक झालेल्या ३४ पैकी ३३ ग्रामपंचायतींवर माजी शिक्षणमंत्री आमदार अमरीशभाई पटेल, आमदार काशीराम पावरा, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाचे सरपंच व उपसरपंच सत्तारूढ झाल्याचा दावा भाजपने केला.

आवश्य वाचा- जयंत पाटीलांनी स्व.हरिभाऊ जावळेंच्या कुटुंबियांची घेतली सांत्वनपर भेट 
 

आज १७ ग्रामपंचायतींच्या सरपंच-उपसरपंच निवडीची प्रक्रिया पार पडली. चार ग्रामपंचायतींचा अपवाद वगळता उर्वरित १३ ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवड करण्यात आली. ११ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदी तर आठ ग्रामपंचायतींवर उपसरपंचपदी महिला विराजमान झाल्या. 

भाटपुरा : येथील सरपंचपदासाठी ललिता चव्हाण व अंजनाबाई कोळी, तर उपसरपंचपदासाठी रोशन सोनवणे व संजय वाघ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. हात उंचावून मतदान घेतल्यानंतर सात विरुद्ध चार अशा फरकाने सरपंचपदी ललिता चव्हाण तर उपसरपंचपदी रोशन सोनवणे यांची निवड करण्यात आली. 

आवर्जून वाचा- लोकसेवेत व्यस्त राहिलात तर सत्तेतही टिकून राहता येते 
 

भावेर : सदस्यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच-उपसरपंचपदासाठी मात्र मतदान घेण्यात आले. सरपंचपदासाठी रंजना धनगर यांनी अनिता राजपूत यांचा पाच विरुद्ध चार अशा फरकाने पराभव केला. उपसरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीत जरिनाबी रफिक यांनी अस्लम मौले यांचा पाच विरुद्ध चार मतांनी पराभव केला. 

विखरण : कमालीच्या चुरशीमुळे ओळखल्या जाणाऱ्या विखरण ग्रामपंचायतीचे सरपंचपद पटकावताना मीना पाटील यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार रुपाली पाटील यांचा आठ विरुद्ध चार मतांनी पराभव केला. उपसरपंचपदासाठी झालेल्या मतदानाअंती आशा कोळी यांनी कमलबाई चव्हाण यांचा आठ विरुद्ध चार अशा फरकाने पराभव केला. 

शिंगावे : अखेरपर्यंत रंगलेल्या ग्रामपंचायतीच्या सामन्यात मंजुळाबाई पाटील यांनी प्रतिस्पर्धी भारती पाटील यांचा सात विरुद्ध सहा अशा फरकाने पराभव केला. उपसरपंचपदाच्या निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांनी संभाजी पाटील यांचा सात विरुद्ध सहा मतांनी पराभव केला. 

हेही वाचा- राजकारणात जन्माला घातलेल्यांनीच माझा छळ केला। खडसेंचे महाजनांवर पून्हा टिकास्त्र 

 

ग्रामपंचायतनिहाय बिनविरोध सरपंच व उपसरपंच असे 
भटाणे : सरपंच विकास पाटील, उपसरपंच मिलिंद ईशी. साकवद : सरपंच जिजाबाई भिल, उपसरपंच शोभाबाई भिल. जातोडा : सरपंच रत्नाबाई धनगर, उपसरपंच प्रतिभाबाई राजपूत. टेकवाडे : सरपंच सुकदेव वाघ, उपसरपंच मंगलाबाई धनगर. बोरगाव : सरपंच काशीबाई भिल, उपसरपंच योगेंद्रसिंह सिसोदिया. मांडळ : सरपंच सीमा सोनवणे, उपसरपंच स्वाती बागूल. वरुळ : सरपंच नरेंद्र मराठे, उपसरपंच अलका कोळी. भोरखेडा : सरपंच दीपक भिल, उपसरपंच प्रशांत राजपूत. सावळदे : सरपंच अनिल दोरीक, उपसरपंच सचिन जाधव. बाभूळदे : सरपंच भिमाबाई पाटील, उपसरपंच संजीव पाटील. जवखेडा : सरपंच कैलास पाटील, उपसरपंच हिराबाई ठाकरे. शेमल्या : सरपंच नेहा पावरा, उपसरपंच तिराग पावरा. 
 

 

संपादन- भूषण श्रीखंडे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sarpanch selection marathi news shirpur BJP claims thirty three gram panchayats shirpur taluka