सावकी गावास स्मार्ट ग्राम पुरस्काराने सन्मानित

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

खामखेडा (नाशिक) : सावकी (ता. देवळा) ग्रामपंचायतीस 2018 चा स्मार्ट ग्राम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात स्वातंत्र दिनाच्या प्रसंगी झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते हा सन्मान देण्यात आला.

खामखेडा (नाशिक) : सावकी (ता. देवळा) ग्रामपंचायतीस 2018 चा स्मार्ट ग्राम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात स्वातंत्र दिनाच्या प्रसंगी झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते हा सन्मान देण्यात आला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे, उपाध्यक्ष नयना गावित, आमदार सीमा हिरे, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गीते, नाशिक पोलिस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रमाणपत्र स्मृतिचिन्ह, दहा लाख रुपयांचा धनादेश सरपंच राजाराम गोधडे, उपसरपंच सुवर्णा पाटील, ग्रामसेवक वैशाली पवार, माजी सरपंच काभा पवार, अरुण शिवले यांनी स्वीकारला.

गावात ग्रामविकासाचे यशस्वी नियोजन केले असून गावात सार्वजनिक व व्यक्तिगत शौचालयांचा वापर भूमिगत गटारी, रस्ता कॉक्रीटीकरण, कचरा व्यवस्थापन, तसेच गावात ग्रामपंचायतीचे संगणकीय पद्धतीने कामकाज, गाव परिसरात वृक्ष लागवड, प्राथमिक आरोग्य केंद्र, उत्कृष्ठ व आरोग्याचे प्रभावी कामकाज, डिजिटल अंगणवाड्यात मुलांना शिक्षण, मुलभूत सुविधांची कामे, महिलांसाठी बचत गट, गावात विविध विकासकामे ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ यांच्या पुढाकाराने होत आहेत. गाव विकासात ग्रामस्थांचाही त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. म्हणून गाव स्वछ व निर्मल ग्राम झाल्याने गाव जिल्ह्यात पुरस्काराचे मानकरी ठरले.

स्वातंत्रदिनी झालेल्या सन्मानाने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. या पुरस्काराबद्दल आमदार डॉ. राहुल आहेर, माजी सभापती केदा आहेर, जिल्हा परिषद सदस्या धनश्री आहेर, पंचायत समिती सदस्या कुसुमताई देशमुख, गटविकास अधिकारी महेश पाटील यांनी सावकी ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी ग्रामस्थांचे अभिनंदन केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Savki gaon awarded the Smart Village