esakal | मत्स्यशेतीने केले मालामाल! तरुण शेतकऱ्याची लाखोंची उलाढाल
sakal

बोलून बातमी शोधा

fish farming

मत्स्यशेतीने केले मालामाल! तरुण शेतकऱ्याची लाखोंची उलाढाल

sakal_logo
By
सचिन महाजन

जामठी (जि.जळगाव) : गोरनाळा (ता. जामनेर) येथील तरुण शेतकरी मोहन वाघ यांनी शास्त्रोक्त पद्धतीने मत्स्यशेती करून स्वयंरोजरागाचा नवा आदर्श निर्माण केला आहे. या व्यवसायातून ते वर्षाकाठी तीन ते चार लाखांचे आर्थिक उत्पन्न मिळवत आहेत.

घरच्या लोकांचा विरोध असूनही मत्स्यशेतीचा निर्णय

विशेष म्हणजे वाघ यांनी शेतीला जोडधंदा म्हणून मत्स्यशेतीचा आधार घेतला असून, तो यशस्वी करून दाखवला आहे. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही त्यांनी बी. एस्सी. (ॲग्रो)पर्यंत शिक्षण घेतले आहे. व्यावसायिक होण्यासाठी शिक्षणाबरोबरच धडाडी आणि मेहनतीच्या माध्यमातून काम करण्याची ऊर्मी सर्वांत महत्त्वाची असते, हे त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले आहे. २०१९ मध्ये त्यांनी सुरवातीला नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेंतर्गत साधारण दीड एकरात शेततळे निर्माण करून, त्यात घरातील थोडी रक्कम गुंतवणूक करत व्यवसाय उभा केला. हळूहळू नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून, त्यांनी या व्यवसायात मोठी भरारी घेतली. आजमितीस त्यांचे वार्षिक उत्पन्न तीन ते चार लाखांपर्यंत पोचले आहे.

हेही वाचा: अनिल परब यांना न्यायालयाचा दिलासा; कारवाई तुर्तास टळली!

अपयशात न डगमगता पाय रोऊन राहिले उभे राहिल्याने यश

शेततळ्यात सायपरनस (कोंबडा), रोहू, कतला यासारख्या माशांचे उत्पादन घेऊन ते आसपासच्या परिसरात त्यांची विक्री करून चांगले पैसे कमावत आहेत. मत्स्यपालनाचे प्रशिक्षण, मत्स्यबीज, मत्स्यखाद्य आणि त्यांना लागणारी औषधे याविषयीची माहिती त्यांनी मिळवली असून, त्या आधारावर आधुनिक पद्धतीने मत्स्यशेती करण्यास सुरवात केली. व्यवसायाची भरभराट पाहून परिसरातील अनेक शेतकरीही त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी येत असतात. नदीमध्ये मासेमारी करताना येथील अनेक जण स्फोटकांचा वापर करतात. यामुळे नदीतील जलचरांचे जीवन धोक्यात येत असल्याचे ते सांगतात. नदीतील मासेमारीसाठी पारंपरिक आणि पर्यावरणाधिष्ठित पद्धतीचाच वापर व्हायला हवा, अशी माहिती ते शेतकऱ्यांना देत असतात. साधारण दीड एकर क्षेत्रात बनविलेल्या शेततळ्यात सुमारे १५ ते २० हजार मत्स्यबीज साठवले जाऊ शकत असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा: खडसेंचे मानसिक संतुलन बिघडले,त्यांना उपचाराची गरज-गिरीश महाजन

शेतीला जोडधंदा हवा म्हणून मत्स्यव्यवसायाची केली निवड

शेतीला जोडधंदा हवा म्हणून मत्स्य व्यवसायाची निवड केली. सुरवातीला पदरी अपयश आले. मात्र, खचून न जाता प्रयत्न सुरूच ठेवले. प्रयत्नांना यश आल्याने आज मत्स्यव्यवसायात भरारी घेतली आहे. मत्स्यव्यवसायातून वर्षाकाठी तीन ते चार लाखांचे अतिरिक्त उत्पन्न मिळत आहे. इतर शेतकऱ्यांनीही शेतीसोबत जोडधंदा म्हणून मत्स्यव्यवसाय करावा. -मोहन वाघ, प्रगतिशील शेतकरी, गोरनाळा

विशेष मुद्दे

* घरच्या लोकांचा विरोध असूनही मत्स्यशेतीचा निर्णय

* शेतीला जोडधंदा हवा म्हणून मत्स्यव्यवसायाची केली निवड

* अपयशात न डगमगता पाय रोऊन राहिले उभे राहिल्याने यश

* व्यवस्थापन तंत्र अवगत केल्याने मत्स्यव्यवसायातून लाखोंचे उत्पन्न

loading image
go to top