अनिल परब यांना न्यायालयाचा दिलासा; कारवाई तुर्तास टळली!

anil parab
anil parabesakal

मुंबई : शिवसेनेचे नेते, राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांना न्यायालयाने दिलासा दिला आहे. त्यामुळे कारवाई तुर्तास तरी टळली आहे. अनिल परब यांनी अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप करत भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी लोकायुक्तांकडे तक्रार केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांचे निवासस्थान असलेल्या आणि शिवसेनेच्या एकेकाळच्या बालेकिल्ल्यातील या कारवाईमुळे राजकीय युद्ध रंगण्याची शक्यता आहे.

किरीट सोमय्यांनी केली होती तक्रार

अनिल परब यांच्या वांद्रे पूर्व येथील कार्यालयावर तोडक कारवाई करण्याचे आदेश लोकायुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार म्हाडाने ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात या कार्यालयावर कारवाईचे नियोजन केले होते ; मात्र कार्यालयाच्या बाजूला असलेल्या सोसायटीने केलेल्या याचिकेवर न्यायालयाने संबंधित बांधकाम १४ ऑक्टोबरपर्यंत तोडण्यास स्थगिती दिली आहे. यामुळे या कार्यालयाला तात्पुरते संरक्षण मिळाले आहे. परब यांनी वांद्रे पूर्वेकडील गांधीनगर येथील इमारत क्रमांक ५७ आणि ५८ मधील मोकळ्या जागा बळकावून अनधिकृत बांधकाम केल्याचे सोमय्या यांनी तक्रारीत म्हटले होते. हे बांधकाम तोडण्यास स्थगिती दिल्याचे म्हाडातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितले.

anil parab
जलसंपदाचे कोणतेही कार्यालय मराठवाड्यात जाणार नाही- जयंत पाटील

'म्हाडा'ने पाठविली नोटीस

परब यांचे वांद्रे पूर्व कार्यालय जमीनदोस्त करण्याची तयारी ‘म्हाडा’कडून MHADA सुरू आहे. त्याचबरोबर याच परिसरात असलेले राष्ट्रवादी कॉग्रेसचे NCP office कार्यालय पाडण्यासाठी 'म्हाडा'ने नोटीस पाठविली आहे. आदेशानुसार म्हाडा या बांधकामावर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात या कार्यालयावर कारवाईचे नियोजन होते; परंतु परब यांनी हे अनधिकृत कार्यालय माझ्या नावे नसल्याचे पत्र म्हाडाला दिले आहे. यातच आता या बांधकामावर कारवाई करू नये, यासाठी या कार्यालयाच्या बाजूला असलेल्या सोसायटीने शहर दिवाणी न्यायालयात याचिका केली होती. त्यावर न्यायालयाने संबंधित बांधकामावर १४ ऑक्टोबरपर्यंत कारवाई न करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे तूर्तास तरी या कार्यालयाला संरक्षण मिळाले आहे.

anil parab
PHOTO : अन् महात्मा गांधींना भेटायला चार्लीन चॅप्लिन घाबरले!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com