धुळे- जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या ऑपरेशन ऑल आऊटमध्ये शुक्रवारी (ता. २८) सुमारे सात लाख किमतीची विविध प्रकारची दारू जप्त करण्यात आली..स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे नरडाणा पोलिस ठाणे हद्दीत हॉटेल बिकानेर समोरील महामार्गावर नाकाबंदी दरम्यान कारला (जीजे २७ एएच ०३७२) पकडण्यात आले. त्यातील विजय गंगाराम राजपाल (वय २७, रा. जुनी सिंधी कॉलनी, नंदुरबार), रोहित लालचंद रोहिडा (वय २३, रा. जुनी सिंधी कॉलनी, नंदुरबार) याला ताब्यात घेत ४ लाख ८७ हजार १०० रुपये किंमतीची हरियाणा राज्यनिर्मित प्रतिबंधित विदेशी दारू व कार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला..४२ जणांवर गुन्हेगावठी हातभट्टी दारू अड्डयांवरही कारवाई करण्यात आली. त्यात २ लाख २ हजार २७० किमतीची ३ हजार २७० लिटर गावठी दारू व रसायन व साहित्य जप्त करीत जागीच नष्ट करण्यात आले. तसेच ४२ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले..संशयितांना पकडलेस्थानिक गुन्हे शाखेने चार पाहिजे व फरार आरोपींना अटक केली. त्यात ओमप्रकाश खुपचंद रेलन (रा. कुमानगर, धुळे), विजय मोतीलाल देसाई (रा. गरुड कॉलनी, देवपूर), गुलाब मधुकर गहिले (रा. धोंडाळ पाडा, नाशिक) व सत्तार मासुम पिंजारी ऊर्फ सत्तार मेंटल (रा. पत्रेवाली मशिदजवळ, धुळे) याचा समावेश आहे. .तसेच तडीपार आदेश डावलून प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करणारा युसूफ मोहम्मद पटेल (पिंपळनेर), विशाल दिलीप पाटील (फागणे, ता. धुळे), सागर राजेंद्र पाटील (शिरपूर), सुनिल दगा कोळी (शिरपूर) या चौघांवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला..उपद्रव करणाऱ्यांवर कारवाईशहर वाहतूक शाखेने ऑपरेशन ऑल आऊट दरम्यान ७ ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी कारवाई करीत ७० हजारांचा दंड वसूल केला. तसेच मोटार वाहन कायद्यान्वये २५३ केसेस करीत १ लाख २० हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. त्यात विना लायसन्स, सिट बेल्ट न लावणे, ट्रिपल सीट, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचा समावेश असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सांगितले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.