Banana Farmers in Shahada Receive Compensation : शहादा आणि नंदुरबार जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना हवामान आधारित फळबाग पीकविमा योजनेचा लाभ मिळाला आहे. संघर्ष समितीच्या पाठपुराव्यानंतर ३३ कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जात आहे.
शहादा: जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हवामान आधारित फळबाग पीकविमा योजना २०२४-२५ अंतर्गत ३३ कोटी रुपयांची नुकसानभरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे.