Power Outages Hit Shahada and Rural Areas After Storms : आमदार राजेश पाडवी यांनी वीज वितरण अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेऊन शहादा आणि ग्रामीण भागातील खंडित वीजपुरवठा तातडीने सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या.
शहादा- शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात वादळामुळे खंडित झालेला वीजपुरवठा तत्काळ सुरू करण्यासह पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणा, शेतकऱ्यांना मुबलक व नियमित वीजपुरवठा करावा, अशा सूचना आमदार राजेश पाडवी यांनी वीजवितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्या.